आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलेटवर फिरण्याची भारी शौक म्हणून त्याच गाड्या चोरायचा; अट्टल चोरटा जेरबंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बुलेटवर फिरण्याची भारी शौक. चोरी करून काही दिवस गाडीवर फिरायचा. त्याला जास्त किंमत येते म्हणून तीच गाडी चोरून विकायचा. अशा पद्धतीने चोरी करणारा संशयित अट्टल चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात अाला अाहे. सागर बसवराज कपाळे ( वय २७, रा. सोमवारपेठ, हल्ली गोदूताई विडी घरकुल पुणे शहर) याला अटक झाली अाहे. 


यापूर्वी त्याला दोनदा अटक केली असून ३० गाड्याही जप्त केल्या होत्या. बुधवारी पुन्हा सोळा गाड्या जप्त केल्या. त्यात पाच बुलेट, होंडा शाईन, होंडा करिझ्मा, एचएफ िडलक्स, स्प्लेंडर, अॅक्टिव्हा या गाड्यांचा समावेश अाहे. ज्यांच्या गाड्या चोरीला गेल्या अाहेत त्यांनी विजापूर नाका पोलिसात जाऊन माहिती घ्यावी. अारटीअोविभागाकडून संबंिधत व्यक्तीची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनी दिली. 
कपाळे हा दुचाकी चोर अाहे. तो पुणे येथे गेला की, तिथून येताना पुणे, हडपसर, इंदापूर भागातून गाड्या अाणतो. सोलापूर शहर ग्रामीण भागातही त्याने आतापर्यंत अनेक चोऱ्या केल्या आहेत. चोरलेल्या गड्या तो कमी दरात तो लोकांना विकतो. बुधवारी सोरेगावजवळील हाॅटेल नागेशजवळ कपाळे हा दुचाकी घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक बाळसाहेब शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. 

 

या पथकाने केला तपास 
शर्मिष्ठाघारगे, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब शिंदे यांच्यासह दगडू राठोड, संजय बायस, अनिल वळसंगे, राकेश पाटील, सुभाष पवार, मंगेश भुसारे, संतोष फुटाणे, जयसिंग भोई, वसंत माने, सोमना सुरवसे, स्वप्नील कसगावडे, सूरज देशमुख, काकडे, निंबाळकर. 

बातम्या आणखी आहेत...