आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यमाई तलावाचा परिसरात निसर्ग प्रेमींनी लुटला पक्षी निरीक्षणाचा आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खर्डी- यमाई तलावाचा परिसर पहाटेचा गुलाबी गारवा,आणि पक्ष्यांची हालचाली पाहण्यासाठी जमलेली बाल मुले आणि निसर्ग प्रेमी.शाळकरी मुलांचा उत्साह, कुतुहल व चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद. निमीत्त होत डॉ सलिम अली यांच्या जयंतीचे. "निसर्ग संवर्धन,पंढरपुर"  व "निसर्ग सखी मंच " यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. 275 च्या वर आलेल्या निसर्गप्रेमीना दहा दुर्बिणी, एक व्हिडिओ स्क्रीनद्वारे पक्ष्यांची माहिती देण्यात आली.

चातक, हळद्या, वारकरी बदक, राखी बगळा, ब्राह्मणी घार, कोकीळा, भारद्वाज, टिटवी, पिवळा धोबी, पांढरा धोबी, कोतवाल, होला, सातभाई लाल मुनिया अशा प्रकारच्या जवळ जवळ 60 पक्षांचे निरीक्षण करता आले आणि तेही अगदी दुर्बीनीतून. या कार्यक्रमासाठी सोलापुरच्या नेचर कॉन्झरवेशन सर्कल या संस्थेच्या शिवानंद हिरेमठ, आनंद चव्हाण, सुशांत कुलकर्णी, अमोल मिस्कीन या सर्व पक्षी तज्ञाचे मोलाच मार्गदर्शन व पक्षांची माहीती मुलांना उपयुक्त ठरली.

या कार्यशाळेस अनेकांचे सहकार्य लाभले त्यापैकीच एक म्हणजे श्री.सतीश गायकवाड सर (कुर्डवाडी) कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहीत्य त्यांनी पुरवले व स्वतः येथे येऊन मदत केली. वनविभाग, पंढरपूरचे सर्व एक दिवसभर या निसर्ग प्रेमिबरोबर राहीले. येथील वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.राजेंद्र कुलकर्णी साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... निसर्गप्रेमीना दुर्बिणी, व्हिडिओ स्क्रीनद्वारे दिली पक्ष्यांची माहिती
बातम्या आणखी आहेत...