आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिप्परगा तलाव येथे पक्षी निरीक्षण कार्यशाळा, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचा उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नेचर काॅन्झर्व्हेशन सर्कल रविवारी हिप्परगा तलाव येथे पक्षी निरीक्षण कार्यशाळा आयोजिली आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान सोलापूर शहर परिसरातील पाणवठ्यांवर मोठ्या प्रमाणवर स्थलांतरित पक्षी येतात. त्या पक्ष्यांची माहिती त्यांची वैशिष्ट्य याबाबतची अभ्यासपूर्ण माहितीसह त्यांचे निरीक्षण करण्यासाठी हौशी पर्यावरणप्रेमींसाठी विशेष कार्यशाळा होणार आहे.

रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पक्षीनिरीक्षणास सुरुवात होईल. इच्छुकांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून कार्यशाळेसाठी ५० रुपये शुल्क आहे. सहभागींना सकाळी छोटा नाश्ता देण्यात येणार आहे. पक्षी निरीक्षणासाठी येताना भडक रंगाचे कपडे घालू नयेत, सोबत वही पेन आवश्यक आहे, पिण्यासाठी पाणी सोबत ठेवावे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी नाना चव्हाण (९९२२३२५६९९) वैभव वंजारी (९१५६०३६१८२) अरविंद म्हेत्रे (९८८७५५०२०० ), शिवानंद हिरेमठ (९४२०७८०८०८) यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन भरत छेडा यांनी केले.