आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ वर्षांपूर्वी जन्मलेल्याचे नाव नोंदवून घ्या दाखला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - आपल्या बाळाच्या नावाची महापालिकेत नोंद नसेल तर आतापर्यंत नावासह दाखला मिळत नव्हता. स्त्री किंवा पुरुष अशी नोंद करून दाखला दिला जात असे. आता बाळाच्या नावासह दाखला देण्याची प्रक्रिया महापालिका जन्म-मृत्यू कार्यालयाकडून सुरू झाली आहे.

१५ वर्षांपूर्वी बाळाचा जन्म असेल आणि जन्म दाखल्यावर नाव नसेल तर त्याची नोंद घेऊन महापालिका नावासह दाखला देणार आहे. त्याबाबत शासनाने आदेश काढला असून, त्याची महापालिकेत अंमलबजावणी सुरू आहे.

जन्म-मृत्यू नोंदणी नियमानुसार १५ वर्षांपर्यंत बाळाचे नाव नोंद करण्याची तरतूद आहे. त्यामुळे एक जानेवारी २००० पूर्वी जन्म झालेल्या बाळाचे नाव महापालिकेत नोंदवले जात नव्हते. तसेच जन्म दाखल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी केली जात नव्हती. दाखल्यावर स्त्री किंवा पुरुष अशी नोंद हाेत होती. परिणामी शासकीय कार्यालयांत जन्म दाखला दिल्यानंतर नाव नसल्याने अडचण येत होती. पासपोर्ट काढण्यासाठी अडचणी येत होत्या. आता बाळाच्या नावाची नोंदणी करून मिळणार आहे. त्यासाठी मनपात अर्ज करावे लागेल.

बाळाचे पूर्ण नाव द्या. (नंतर नाव बदलता येत नाही)
रोज १५ अर्ज : नावदाखल करण्यासाठी महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात रोज सुमारे १५ अर्ज येत आहेत. १४ मे २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नावाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सादर करा.

दाखला मराठी इंग्रजीतून एकाचवेळी
महापालिकाजन्म-मृत्यू कार्यालयात आतापर्यंत दाखले देताना मराठी इंग्रजी भाषेतील असे वेगवेगळे दोन दाखले दिले जात हाेते. त्यासाठी नागरिकांना वेगवेगळे पैसे मोजावे लागत असे. त्यात सुधारणा करून मराठी इंग्रजी नोंद असलेला एकच दाखला नागरिकांना देण्यात येणार आहे. त्याचा फायदा होणार आहे.

नागरिकांनी लाभ घ्यावा
१५ वर्षानंतर मनपात बाळाची नोंद घेण्यात कायदेशीर अडचण होती. ती आता दूर झाली आहे. आवश्यक कागदपत्र नागरिकांनी सादर करून लाभ घ्यावा. नेताजीभडंगे, मनपा जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय प्रमुख