आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृहात एकजुटीचे भाजपपुढे आव्हान, सभागृह नेत्यांचा लागणार कामकाजात कस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - महापालिकेच्या पदाधिकारी निवडीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर विभानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना झुकते माप मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात तरी महत्त्वाची पदे भूषवणारे नगरसेवक येथूनच आहेत. तिन्ही विधानसभा मतदारसंघातून सर्व समान प्रतिनिधीत्व मिळालेले नसल्याने नगरसेवक नाराज आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मानणारा गट नाराज आहे. नव्या सभागृहात भाजपचे नगरसेवक एकत्रितरीत्या येण्याऐवजी गटाने आले. त्यातून भाजपच्या गटबाजीपासून सभागृहाची सुटका नसल्याचे दिसून आले. 
 
महापौर, सभागृह नेता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आहेत. स्थायी समिती सभापतिपद शहर उत्तर मतदार संघाकडे जाण्याची शक्यता आहे. उपमहापौर शहर मध्यच्या आहेत. होटगी रस्ता आणि विजापूर रस्ता परिसरातील दहा नगरसेवक आहेत. तेथून एकाचीही समितीत निवड झालेली नाही. स्वतंत्रपणे गट करून नगरसेवकांनी प्रवेश केला. पालकमंत्र्यांच्या जवळचे असलेले शिवानंद पाटील यांच्या घरात ३५ नगरसेवकांनी बैठक घेऊन महापौरपदाचा कार्यकाळ जाहीर करा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी धावाधाव करावी लागली. 

महापौरांना कामकाजात अडचण 
काँग्रेसच्यामाजी महापौर नलिनी चंदेले, अलका राठोड, सुशीला आबुटे यांना पक्षातील गटबाजीमुळे काम करताना अडचणी आल्या. पण त्यावर त्यांनी यशस्वी मात करत कार्यकाळ पूर्ण केला. पण शोभा बनशेट्टी यांच्यापुढे नाईलाजाने मतदान करणाऱ्यांचे आव्हान दिसते. तसेच या गटबाजीने स्वीकृत नगरसेवकासाठी पक्षातील अभ्यासू नेत्यांची नावे बाजूला पडत आहेत. नगरसेवकांना आपल्या गटाकडे ओढण्याचा प्रयत्न दोघा देशमुख मंत्र्यांचा सुरू आहे. याचा त्रास महापौर बनशेट्टी यांना होऊ शकतो. एकमुखाने कठोर निर्णय होणे अशक्य असेल. 
 
बातम्या आणखी आहेत...