आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवक, उपाध्यक्षांनी ठोकले उद्यान विभागास टाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वारंवार सांगूनही प्रभागातील झाडाच्या फांद्या तोडण्यास मनपा उद्यान विभागाचे कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे जाब विचारण्यासाठी भाजपचे नगरसेवक संजय कोळी शहर भाजपचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील बुधवारी सकाळी उद्यान विभागात गेले होते. तेथे कोणी नसल्याने कार्यालयास कुलूप लावून काही काळ आंदोलन केले.

महापालिका उद्यान विभागात १२० कर्मचारी असले तरी त्यापैकी काही कर्मचारी अन्यत्र वर्ग करण्यात आले. ३२ उद्यानांसाठी ३२ कर्मचारी आहेत. काही कर्मचारी रजेवर असतात. त्यामुळे अन्य कामासाठी कर्मचारी नसल्याने उद्यान विभागाबाबत ओरड सुरू आहे. नगरसेवक संजय कोळी यांनी उद्यान विभागप्रमुख राहुल जाधव, सहायक अजयकुमार चौहान यांना वारंवार सांगूनही कर्मचारी दिले नाहीत. याबाबत विचारणा करण्यासाठी कोळी पाटील बुधवारी सकाळी ११ वाजता कार्यालयात गेले होते. तेथे कोणी नसल्याने कार्यालयास कुलूप ठोकले. सहायक आयुक्त अभिजित हरळे यांनी तेथे जाऊन नगरसेवक कोळी पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. कार्यालयाचे कुलूप काढले प्रभागाची पाहणी केली.

प्रभागातील झाड्याच्याफांद्या तोडण्यासाठी वारंवार सांगूनही उद्यान विभागाचे कर्मचारी आले नाहीत. कार्यालयात गेले असता कोणी नाही. कर्मचारी वेळेवर येत नाही. त्यामुळे टाळे ठोकले.'' - संजय कोळी, नगरसेवक

उद्यान विभागात कर्मचारी नाहीत. असलेले कर्मचारी येत नसल्याने त्यांच्या हजेरीसाठी बायोमॅट्रिक्स करणार आहे. त्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवणार.'' - अभिजितहरळे, सहा आयुक्त उद्यान विभाग
बातम्या आणखी आहेत...