आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार ठाकुरांचे नियम डावलून तुळजाभवानी देवीचे \'व्हीआयपी\' दर्शन; हजारो भाविक ताटकळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार ठाकूर यांच्या व्हीआयपी दर्शनामुळे हजारो भाविक ताटकळले होते. - Divya Marathi
आमदार ठाकूर यांच्या व्हीआयपी दर्शनामुळे हजारो भाविक ताटकळले होते.
तुळजापूर - भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी रविवारी मंदिर देवस्थानचे सर्व नियम मोडीत काढत आपल्या ५० ते ६० कार्यकर्त्यांबरोबर श्री तुळजाभवानी देवीचे ‘व्हीआयपी’ दर्शन घेतले. त्यामुळे बराच वेळ ताटकळत बसावे लागणाऱ्या इतर भाविकांनी मात्र संताप व्यक्त केला. 
 
भाजप आमदार ठाकूर रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कार्यकर्त्यांसह तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले. ठाकूर आणि त्यांच्यासमवेत आलेल्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे नियम डावलून मंदिरात घुसून दर्शन घेतले. यामुळे जवळपास अर्धा तास रांगेत उभारलेल्या हजारो भाविकांना ताटकळत उभे राहावे लागले.
 
काय आहे नियम 
- मंदिर संस्थानच्या नियमानुसार अभिषेक पूजेदरम्यान व्हीआयपी दर्शन बंद असते. 
- तसेच रविवारी, मंगळवारी शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवले आहे.  - असे असताना ठाकूर यांनी मंदिराचे नियम डावलून मंदिरात घुसून दर्शन घेतले. 
 
काय म्हणाले मंदिर व्यवस्थापक
-  जर आमदार ठाकूर यांनी नियम डावलून व्हीआयपी दर्शन घेतले असेल तर माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान सुजित नरहरे यांनी दिली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...