आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साेलापूर जिल्ह्यातही भाजप, शिवसेना महायुतीलाच मतदारांनी दिला कौल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप -शिवसेना - स्वाभिमानी, रासप यांच्या महायुतीने संघटितपणे नगरपालिका निवडणुका लढवल्या नसल्या तरीही नागरी मताचा कौल सत्ताधारी पक्ष व त्यांच्या अाघाड्यांकडे थोडासा झुकला असल्याचे चित्र अाहे. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेत अाक्रोश असल्याचे सांगितले जात असताना भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, स्वाभिमानी पक्ष -रासप-रिपाइं यांच्यासोबत असलेल्या महायुतीला दोन असे सहा नगराध्यक्ष निवडून अाल्याचे चित्र साेलापूर जिल्ह्यात दिसून अाले. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या दुधनीत भाजप नगराध्यक्ष हे गुपितच ठरले अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीने करमाळा व मंगळवेढ्यात घातलेली गणिते सत्तेपर्यंत जाण्यास यशस्वी ठरली तर राष्ट्रवादी- शेकाप यांच्या युतीला सांगोल्यात व दुधनीत काँग्रेसला संख्याबळ टिकवता अाले.
राज्यात सत्तेत एकत्र असले तरी साेलापूर जिल्ह्यात भाजप- शिवसेना, स्वाभिमानी, रासप, रिपाइं या महायुतीतील मित्रपक्षांची एकत्र बाेट बांधण्यात यश अाले नव्हते. स्थानिक स्तरावर त्या-त्या पक्षाने जातवर्गाचे गणित मांडून प्रसंगी एकमेकाविराेधात लढतही दिली. बार्शी वगळता नगरपालिकेचा पूर्ण कौल विरोधी बाजूने झुकला असे दिसले चित्र नाही. राष्ट्रवादी-काँग्रेस- शेकाप यांच्याकडे मिळून करमाळा, मंगळवेढ्यात सत्ता तर दुधनी, सांगोल्यात सर्वाधिक संख्याबळ अाल्याने या चार पालिकांमध्ये फार काही फेरबदल झालेले नाहीत. कुर्डूवाडीत शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून अाला तर नगरसेवकांचे संख्याबळ स्वाभिमानी, रिपाइं यांच्या स्वाभिमानी अाघाडीला मिळाले अाहे. कुर्डूवाडी व बार्शीत सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुध्द लढले, तरीही या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला यश मिळवता अाले नाही.

दुधनी नगराध्यक्षपदी भीमाशंकर इंगळे यांच्या बाजुचा कौल काँग्रेससाठी धक्कादायक अाहे. अनुसूचित जातीसाठी अारक्षित असलेल्या नगराध्यक्षपदावर भाजपाने विजय मिळवून काँग्रेसला जोरदार धक्का दिला अाहे. विशेष म्हणजे त्यांचा उमेदवारीचा अर्जच बाद ठरवला गेला. त्याचा फटकाही सत्ताधारी गटाला बसला. बार्शीत राष्ट्रवादीला जोरदार धक्का शिवसेनेने दिला अाहे. अध्यक्षपदाची उमेदवारी अल्पसंख्यांक वर्गातील अॅड.असिफ तांबोळी यांना देऊन सोशल इंजिनिअरिंग साधले. अल्पसंख्य मताचा बार्शीतील टक्का लक्षणीय अाहे. शिवसेनेला अल्पसंख्याक पट्ट्यातून मोठे मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर परिचारक यांच्यागटाकडे मागील निवडणुकीत पंढरपूरची सत्ता होती. प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेवर भाजप-सेनेच्या मदतीने िनवडून गेले. परिचारक यांनी भाजपला सोबतीला घेऊन विकास अाघाडीचे वर्चस्व सिध्द करून अापल्याच गटाकडे सत्ता राखली. अामदार भारत भालके यांनी काँग्रेसकडून संतोष नेहतराव यांना उमेदवारी दिली, परंतु विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांचे मन वळवण्यात त्यांना अपयश अाले अाणि त्यांच्या मतविभागणीचा फायदा परिचारक गटाला झाला.
कुर्डूवाडीत शिवसेना विजयी
कुर्डवाडीत शिवसेनेला ७ जागांवर समाधान मानावे लागले. समीर मुलाणी हे नगराध्यक्ष म्हणून निवडून अाले. यापूर्वी मुलाणी यांच्या नेतृत्वाखालीच पालिकेत सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी िवरोधात िशवसेना-रिपाइं-स्वाभिमानी अशी महाअाघाडी होती. महाअाघाडीकडे सत्ता होती. या िनवडणुकीत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते संजय िशंदे यांनी िशवसेना वगळून महायुती तयार करून अापले संख्याबळ मिळवले अाहे. मंगळवेढ्यात राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या अाघाडीच्या अरुणा माळी निवडून अाल्या. विरोधी भाजप, सेना व परिचारक यांना एकत्रित मोट बांधला अाली नाही. त्याचा फायदा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला येथे झाला. परिचारक-रासप यांच्या अाघाडीला केवळ १ जागा तर भाजपने ३ व सेनेने २ जागा मिळवल्यात. अक्कलकोटमध्ये भाजपने सत्ता राखली. काँग्रेसला ७ तर राष्ट्रवादीला १ जागेवर समाधान मानावे लागले. करमाळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने शेवटच्या टप्प्यात अाघाडी केल्याने विरोधकांना येथे काही करता अाले नाही.
शेकापला धक्का
सांगोल्यात शेकाप व राष्ट्वादीला चांगलाच धक्का बसला. िशवसेना- रासप- रिपाइं- स्वाभिमानी अाघाडीच्या राणी माने यांनी नगराध्यक्षपद हिसकावून घेतले. शेकापने पाच वर्षात पाच सात नगराध्यक्ष दिले हाेते. विशेष म्हणजे त्यांचे दाेन नगराध्यक्ष लाच घेताना सापडल्याचे प्रकरण समोर अाले. भ्रष्टाचाराचा मुद्दा या िनवडणुकीत सांगोल्यात महत्वाचा ठरला. अाघाडीने ८ जागा मिळवल्या अाहेत.
श्रीकांत कांबळे, वृत्तसंपादक, साेलापूर
बातम्या आणखी आहेत...