आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त महापौर निवडीचे: भाजप नगरसेवकांच्या घोषणांनी दुमदुमले सभागृह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - “भारतीयजनता पक्षाचा विजय असो, मालक झिंदाबाद, बापू झिंदाबाद, शोभाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’ असा भाजपचा जयघोष महापालिकेच्या सभागृहात मार्च रोजी प्रथमच दुमदुमला. निमित्त होते महापौर निवडीचे. 
 
महापौर पदासाठी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हात उंचावून मतदान झाले. यामध्ये शोभा बनशेट्टी यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला. यानंतर उपमहापौरपदासाठी शशिकला बत्तुल विजयी झाल्या. बसपच्या नगरसेवकांच्या टोपीवर “सोलापूर जनतेचा आवाज’ असे लिहिले होते. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सभागृहात महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार केला. महापौर कक्षात येताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बनशेट्टी मित्र परिवाराने नूतन महापौरांचा सत्कार केला. 
 
बनशेट्टी यांनी प्रथम आजी सासू यांचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. यानंतर सासू, सासरे यांचा आशीर्वाद घेतला. तर दोन्ही मुलींनी गळा भेट घेतली. बहिणी, जाऊ, मैत्रीणी यांनी सत्कार केला. वडील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना पाहून बनशेट्टी यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बनशेट्टी यांनी अभिवादन केले. आतषबाजीसाठी एेनवेळेला परवानगी मागितल्याने पोलिसांनी दिली नाही. कार फुलांनी सजवण्यात आली होती. त्या कुटुंबासह चार हुतात्मा पुतळा आणि सिद्धरामेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. यानंतर उपमहापौर बत्तुल यांनीही महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
 
गटनेते पदाच्या निवडीवर झाला पक्षांचा जयघोष 
शिवसेनेच्या गटनेतेपदी महेश कोठे यांचे नाव निश्चित होताच ‘शिवसेना झिंदाबाद, आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला, घरकुलचा वाघ आला’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर एमआयएमच्या गटनेतेपदी तौफिक शेख यांचे नाव निश्चित होताच ‘एमआयएम पक्षाचा विजय असो, देखो देखो कौन आया, सोलापूर का शेर आया’ अशा घोषणा देण्यात आल्या. बसपच्या गटनेतेपदी आनंद चंदनशिवे यांचे नाव निश्चित होताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
बातम्या आणखी आहेत...