आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे 21, सेनेचे 14, काँग्रेसचे आणि 24 अपक्षांसह 65 अर्ज मागे, आज स्पष्ट होणार लढतीचे चित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी १०६७ अर्ज आले आहेत. त्यापैकी अर्ज मागे घेण्याची मुदत सात फेब्रुवारी दुपारी तीन पर्यंत आहे. सहा फेब्रुवारी रोजी ६५ अर्ज माघारी घेण्यात आले. १००२ अर्ज अद्याप शिल्लक आहेत. सोमवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये भाजपाचे २१, शिवसेनेचे १४, काॅग्रेसचे ३, अपक्ष २४, बसपा, मनसे आणि परिवर्तन समाज पार्टीचे प्रत्येकी एक असे ६५ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यात पक्षाचे असले तरी त्यांना पक्षाचे बी फार्म मिळाले नाही त्यामुळे त्यांनी माघार घेतले. अर्ज मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मनधारणी सर्वच नेत्याकडून केले जात आहे. 

पक्षाचे उमेदवारी मिळेल म्हणून सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आॅनलाईन अर्ज भरले पण अधिकृत उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांचा अर्ज अपक्षात समावेश करण्यात आला. अर्ज दाखल केलेल्यानी मागे घ्यावे यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे प्रताप चव्हाण,महेश कोठे आदींनी प्रयत्न केले. काॅग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे, मनसेकडून युवराज चुुंबळकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी अर्जदार येत होते. त्यात भाजपाची संख्या अधिक आहे. नगरसेविका रोहिणी तडवळकर, निर्मला ओझा, इंद्राबाई जमादार, शोभा नष्टे, विजय इप्पाकायल, मधुकर वडनाल आदींचा समावेश आहे. काॅग्रेसचे मानसी होनराव, कुरेशी अल्लामद्दोन यांचा सामवेश आहे. शिवसेनेचे वैशाली जाधव, शेखर इराबत्ती, ज्योती चव्हाण, सुनंदा व्हनमोरे आदींचा समावेश आहे. यात काही जणांचे नावे असले तरी त्यांनी दोन अर्ज भरले त्यापैकी एक अर्ज मागे घेतले.  

विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे प्रताप चव्हाण,महेश कोठे आदींनी प्रयत्न केले. काॅग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे, मनसेकडून युवराज चुुंबळकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी अर्जदार येत होते. त्यात भाजपाची संख्या अधिक आहे. नगरसेविका रोहिणी तडवळकर, निर्मला ओझा, इंद्राबाई जमादार, शोभा नष्टे, विजय इप्पाकायल, मधुकर वडनाल आदींचा समावेश आहे. काॅग्रेसचे मानसी होनराव, कुरेशी अल्लामद्दोन यांचा सामवेश आहे. शिवसेनेचे वैशाली जाधव, शेखर इराबत्ती, ज्योती चव्हाण, सुनंदा व्हनमोरे आदींचा समावेश आहे. यात काही जणांचे नावे असले तरी त्यांनी दोन अर्ज भरले त्यापैकी एक अर्ज मागे घेतले. 

अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस 
अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारी दुपारी तीन पर्यंत मुदत आहे. स्वता अर्जदार, सूचक, अनुमोदक किंवा अर्जदारांनी अधिकृतपणे नियुक्त केलेले प्रतिनिधी मार्फत अर्ज मागे घेता येतो. अर्जदाराशिवाय दुसरे आल्यास त्यांच्याबाबत पुर्णपणे खात्रीकरून अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली जाईल असे महापालिका मुख्य निवडणुक अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली. मंगळवारी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त राहणार आहे. 

विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांनी मागे घेतले अर्ज असे 
शहर उत्तर - भाजपा १४, शिवसेना ८, काँग्रेस १, राष्ट्रवादी १, अपक्ष ५. एकूण २९ 
शहर मध्य - भाजपा ४, शिवसेना ३, काँग्रेस १, मनसे १, परिवर्तन समाज पार्टी १, बसपा १, अपक्ष ९. एकूण १९ 

शहर दक्षिण -भाजपा ३, शिवसेना ३, काँग्रेस १, अपक्ष १०. एकूण १७
बातम्या आणखी आहेत...