आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लिचिंग पावडरप्रकरणी माढ्यातच तीन गुन्हे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पालखीमार्गावरील गावांना खराब गुणवत्तेची ब्लिचिंग पावडर पुरवठा केल्याप्रकरणी फक्त माढा तालुक्यातील अरण, मोडनिंब कव्हे या ग्रामपंचायतींनी पुरवठादार कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले असून इतर तालुक्यांमध्ये पुरवण्यात आलेली पावडर चांगल्या दर्जाची असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

पुरवठादारएकच, गुन्हे माढ्यातच
पालखीमार्गावरील गावांना आर्यन कंपनीतर्फे ब्लिचिंग पावडरचा पुरवठा झाला. माजी सभापती कांबळे यांनी गुणवत्ता खराब असल्याची तक्रार केली होती. त्याप्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. पण, कारवाई फक्त माढा तालुक्यातील तीन गावांमध्येच झाली. माळशिरस, पंढरपूर, बार्शी, दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यात पुरवण्यात आलेली पावडरची गुणवत्ता चांगली आहे, असे सीईओनी सांगितले. सुरवातीला पुरवठादाराचे पेमेंट थांबविण्याचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता ती पावडर चांगली असल्याचे स्पष्टीकरण दिले. एकाच पुरवठादाराची पावडर फक्त माढ्यातच खराब अन्् इतरत्र तालुक्यांमध्ये चांगली कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण, १७.६ टक्के ते २६ टक्केपर्यंतच क्लोरीनचे प्रमाण असणारी निकृष्ट दर्जाची ब्लिचिंग ‘आर्यन मंगल ब्लिच’ कंपनीने पुरवठा केल्याची तक्रार माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी केली होती.

ग्रेड दोन उपलब्धक्लोरीनचे प्रमाण आवश्यक
ग्रेड एक पावडरभरताना आयएस मानांकन
या गावांसाठी पावडर खरेदी
जिल्ह्यातीलपालखी मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी करण्यात आली होती. माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर तालुक्यात पुरवठा झालेल्या पावडरचा दर्जा खराब असल्याचे तपासणीत आढळले.

पावडरच्या गुणवत्ता तपासणीचे आदेश
तक्रारीनंतरमुख्य कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी ब्लिचिंग पावडरच्या गुणवत्ता तपासणीचे आदेश दिले. त्याप्रकरणी अार्यन कंपनीच्या विरोधात ग्रामसेवकांनी फौजदारी गुन्हे दाखल केलेत. इतर तालुक्यांमध्ये पावडरमध्ये कोणताही दोष नाही, असेही डोंगरे यांनी स्पष्ट केले.
^पावडरची गुणवत्ता तपासणीचे आदेश दिले. माढ्यात तीन ठिकाणी खराब पावडर आढळल्याप्रकरणी फौजदारी कारवाई झाली. इतर ठिकाणी पावडरमध्ये दोष आढळले नाहीत. त्याबाबतचा अहवाल मागवला आहे. अरुणडोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...