आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध ढेंबरे एमपीएसएसी परीक्षेत राज्यात प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एमपीएसएसच्या क्लर्क - टायपिस्ट परीक्षेत यलगुलवार कनिष्ठ महाविद्यालयातील युवक विकास ज्ञानदेव ढेंबरे याने अंध - अपंग संवर्गात राज्यात प्रथम क्रमांकाचे यश पटकाविले. त्याचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील टोणेवाडी हे आहे. सोलापुरातील चंद्रभागाबाई यलगुलवार कनिष्ठ महाविद्यालयातून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पहिली ते पाचवीचे शिक्षण राजीव गांधी अंधशाळा, दहावीपर्यंत चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत शिक्षण घेतले.
एमपीएससीची परीक्षा २३ फेब्रुवारी २०१५ ला झाली होती. यानंतर मार्च रोजी कागदपत्रांची व्हेरीफिकेशन झाल्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. विकासने ही परीक्षा पुणे केंद्रातून दिली. मुंबईत मुलाखती झाल्या आणि अंतिम निकाल घोषित झाला. क्लर्क पदाची ही परीक्षा असली तरी अंध अपंग संवर्गातून सोलापूरच्या युवकाने राज्यात प्रथम क्रमांकाचे यश पटकावण्याचा आनंद विकासहीत सर्व शिक्षक अणि त्याच्या मित्रांनाही झाला आहे.

संघर्षशील वाटचाल करीत असताना आपल्याला लहानपणापासून यलगुलवार संस्थेने घडविले याची सार्थ जाणीव विकास बाळगून आहे. मराठी टायपिंग शिकून त्याने यातही गती प्राप्त केली आहे. मित्रांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनपर संवादातून त्याने या संघर्षाला यशाचे कोंदण मिळवून दिले.

अंध विकास ढेंबरे
शिक्षक आई - वडील यांना यश समर्पित
Ãआई-वडिलांना,सर्व मार्गदर्शक शिक्षकांना यश समर्पित आहे. या यशात माझ्या सर्व सुख- दु:खात सहभागी असणाऱ्या माझ्या मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. वाचनासाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांचा अाधार मिळाला. शिक्षक मित्रांनी वृत्तपत्र वाचून दाखविल्यामुळे घडामोडी समजतात. विकासढेंबरे, एमपीएससी यशस्वी

बातम्या आणखी आहेत...