आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्त विलगीकरण मशीन धूळखात पडून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिल हॉस्टिपलच्या रक्तपेढीमध्ये रक्त घटक विलगीकरण करणाऱ्या मशीन आणल्या आहेत. त्या एफडीआयच्या नियमानुसार बसवल्या आहेत. याला सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी सेवा सुरू झालेली नाही. कारण काय तर मशीनची तपासणी होणे बाकी आहे. अन्न औषध विभागाकडून यंत्रसामग्रीची तपासणी होत असते. ही तपासणी सोलापूर, मुंबई दिल्लीची टीम करते. परंतु हॉस्पिटलने अन्न औषध विभागाला तपासणीसाठी आवश्यक प्रस्तावच दिलेला नाही. तपासणी कशी होणार? त्यामुळे मशीन पडून आहेत.
सिव्हिल रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी वरदायिनी ठरत आहे. एक वर्षापूर्वी सात सहा महिन्यापूर्वी १५ मशीन रक्तपेढीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्या मशीनची व्यवस्थित जोडणी करण्यात आली आहे. या मशीन साधारणपणे दीड कोटीच्या आहेत. परंतु तपासणीविना पडून आहेत. चांगली सेवा देण्यासाठी तयार आहोत, असे म्हणणारे सिव्हील का रुग्णांना सेवा देण्यासाठी दिरंगाई करतेय? गत महिन्यात सिव्हिलमध्ये डेंग्यूचे ५६ रुग्ण दाखल होते. त्यांना प्लेटलेटची गरज होती. त्यांना खासगी रक्तपेढीतून आणावे लागले. सिव्हिलमध्येच रक्त घटक मिळण्याची सोय झाल्यास रुग्णांना फायदा होण्यास मदत होईल.

रक्त हा शरीरातील एक जीवनावश्यक घटक आहे. सजीव शरीरात रक्त नेहमी रक्तवाहिन्यात वाहत्या स्वरूपात असते. रक्ताच्या माध्यमातून शरीरातील सर्व कोशांना प्राणवायू, अन्नरस, पाचक द्रव्ये नलिका विरहित ग्रंथींचा अंर्तस्राव यांचा पुरवठा होतो. मानवाने अजूनही रक्त निर्मितीचा शोध लावल्यामुळे मानवी रक्ताला पर्याय नाही. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आपण रक्त घटक वेगवेगळे करून निरनिराळ्या रोगासाठी उपयोग करू शकतो. तसे मानवाच्या शरीरातील रक्त निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये रक्तदानाने काहीही फरक पडता नवीन रक्त हे २५ दिवसांत तयार होते. रक्त घटक निर्मितीमुळे रक्ताच्या भरणामुळे होणाऱ्या रोगापासून रक्तभरणापासून होणाऱ्या त्रासापासून रुग्णाला वाचवू शकतो.

या आहेत मशीन अथवा यंत्रसामग्री : ररेफ्रिजरेटरसेन्ट्रीफ्यूज, प्लाझ्मा फ्रीझर, डबल पॅन स्केल, अल्ट्रा लो डीप फ्रीझर, डोनर कोच, पीएच मीटर, सेल काऊंटर, जेल सेंन्ट्रीफ्यूज विथ १२ कॅप, लॅमिनर एअर फ्लो, स्टरल कनेक्टींग डिव्हाईसेस, प्लाझ्मा एक्सप्रेसर ए, अरबा लिझा वॉश, अरबा लिझा स्कॅन आदी मशीनचा समावेश आहे.

रक्तकुणाला किती लागते? : हृदयाच्याशस्त्रक्रियेमध्ये सहा युनिट रक्त आणि सहा युनिट प्लेटलेट्स लागतात. बर्न म्हणजे भाजलेल्या व्यक्तींना किमान २० युनिट प्लेटलेट्स लागतात. अवयव प्रत्यारोपणामध्ये ४० युनिट रक्त आणि ३० युनिट प्लेटलेट्स लागतात. मोटार अपघातातील व्यक्तींना जवळपास ५० युनिट रक्त लागू शकते, तर बोन मॅरो ट्रान्सप्लँट -हाडातील मगज प्रत्यारोपणात तब्बल १२० युनिट प्लेटलेट्स आणि २० युनिट रक्ताची गरज लागते. सिकल सेल अॅनिमियाच्या रुग्णांना सातत्याने रक्ताची गरज असते.

Àपृथक लालकोश किंवा पेशी (आर. बी. सी. पॅक सेल) या ते अंश सेंटीग्रेडला ३५ दिवस साठवता येतात. विशिष्ट प्रकारचे द्रव्य त्यात असल्याने त्या जिवंत राहतात. दुसऱ्या एका द्रव्यामुळे ४२ दिवस टिकू शकतात.

Àतांतुलीजन्य प्लाविका (एफ. एफ. पी.) हा रक्त घटक ३० अंश सेंटीग्रेडला वर्ष साठविता येतो.
Àरक्तबिंबिका पृथक रूप (प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट) हा रक्त घटक रक्तसंकलन पिशवीमधून विघटित करून २० ते २४ अंश सेंटीग्रेडला दिवस ठेवता येतो.

Àरक्तबिंबिका संकलित रूप (प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट एसडीपी)यंत्रात रक्त फिरते रक्तबिंबिका विघटित होऊन रक्तदात्यांच्या अंगात परत जाते. हा प्रकार २० ते २४ अंश सेंटीग्रेडला ते दिवस हलत्या यंत्रात साठविता येतो.

Àतांतुली जन्य प्लाविका घनरूप (कायोप्रेसिपिटेड) हे जर तांतुलीजन्स प्लाविकेपासून वर्षभर टिकविता येते.
रक्त घटक हे वेगवेगळ्या प्रकारचे असून त्यांचे आपल्या शरीरातील कार्य वेगवेगळे असते. संपूर्ण रक्तापासून खालील घटक काम करतात.

लालकोश किंवा लाल पेशी आर. बी. सी. : यापेशी आपल्या शरीरातील प्राणवायू कार्बनडाय ऑक्साईड या वायूंची देवाणघेवाण करतात.
पांढऱ्यापेशी किंवा श्वेत कोश (डब्ल्यू. बी. सी.) : यापेशी आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवून जिवाणू विषाणू यांच्या विरोधात लढतात.
प्लाविका(प्लाझमा) : याच्यामुळेशरीरातील अन्नरस पाचक द्रव्ये आपल्या पेशींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होते. तसेच त्यामुळे आपल्या रक्त वाहिनीत द्रव्याचे प्रमाण योग्य राहते.
रक्तबिंबिका(प्लेट्लेट्स) : यारक्तातील पेशींची गुठळी होऊन रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करतात.
Àमशीनची इतर गोष्टीची तपासणी करण्यासाठी एफडीआयकडे अर्ज करावा लागतो
Àअर्ज केल्यानंतर सीडीएससीओकडे पाठविला जातो. सुरुवातीला मुंबई त्यानंतर दिल्लीला पाठविला जातो.
Àप्रस्ताव दाखल झाल्यानंतर केंद्र राज्य शासनाचे औषध निरीक्षक येऊन तपासणी करतात. काही त्रुटी आढळल्यास पुन्हा प्रस्ताव पाठवून तपासणी केली जाते.
À रक्त घटक विलगीकरण मशीन बसविण्यासाठी मंजुरी असेल तर जागेचा नकाश मंजूर करून घ्यावा.
À सर्व मशीन, तज्ज्ञ कर्मचारी आवश्यक असलेली कागदपत्रांची फाईल नीट असावी.
^सिव्हिल हॉस्पिटलमधीलरक्तपेढीमध्ये संपूर्ण रक्तातील घटक विलगीकरण करण्याची सोय झाली आहे. चांगली गोष्ट आहे. लवकर सुरू करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाकडून परवाना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णांना याचा फायदा होईल.”
विजयकुमारदेशमुख, पालकमंत्री

^सर्वचमशीनआल्या आहेत. त्यांची जोडणी नियमाप्रमाणे केली आहे. राज्य केंद्रच्या अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी होऊन सुरू करण्यासाठी परवाना प्राधिकार विभागाकडून देण्यात येतो. त्यानंतर सुरुवात होईल. परवान्यासाठी तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.” डॉ.सुशील सोनवणे, रक्तपेढी प्रमुख

^दोन-तीनमहिन्यातवापर सुरू सिव्हिलमध्ये रक्त घटक विलगीकरण करण्यासाठी दीड कोटीच्या मशीन आल्या आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. दोन ते तीन महिन्यात एफडीआयकडून तपासणी हाेऊन प्रत्यक्षात वापर सुरू केला जाईल.” डॉ.पंडित जी. ए., पॅथॉलॉजी विभागप्रमुख

^सिव्हिलच्या रक्तपेढीकडून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर राज्य केंद्राची टीम येऊन तपासणी करून जाईल. त्यानुसार प्रस्ताव परवाना प्राधिकार विभागाकडे दिला जाईल. परवाना मिळेल. परंतु अद्याप प्रस्ताव दाखल झाला नाही. प्रस्ताव दाखल झाल्यास महिन्यातच तपासणी होईल. त्रुटी असतील तर उशीर होऊ शकतो.” ए.एम. खडतरे, सहाय्यक आयुक्त, औषध प्रशासन
^सिव्हिलमधीलरक्तपेढीमध्येदोन वर्षापूर्वी निम्मे तर सहा महिन्यापूर्वी काही साहित्य आले आहे. शासनाकडून कोट्यवधी खर्च करून मशीन आल्या. परंतु प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. वैद्यकीय संचालकांना तक्रार दिली आहे. कारवाई नाही केली तर उपोषण करणार आहे.” अप्पासाहेब कोरे, सभापती, कृषी पशुसंवर्धन विभाग
बातम्या आणखी आहेत...