आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदनगृह मरणासन्न; डॉक्टरांचाच जीव धोक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छदेनगृह जीर्ण झाले असून प्रचंड दुरवस्था झाली आहे. - Divya Marathi
शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छदेनगृह जीर्ण झाले असून प्रचंड दुरवस्था झाली आहे.
शिराढोण - कळंब तालुक्यातील शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील शवविच्छेदन गृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून डॉक्टर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन शवविच्छेदन करावे लागत आहे. 
 
शवविच्छेदन गृहाची इमारात जीर्ण झाली असून पावसाळ्यात कोणत्याही क्षणी ती ढासळण्याची भीती वाढली आहे. ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या नावाखाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची परिसरातील ग्रामस्थांची ओरड आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासकीय मंजुरीला महिने पूर्ण झाले असूनही शिराढोण परिसराचे अद्ययावत रुग्णसेवेचे स्वप्न प्रत्यक्षात कधी उतरणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यानंतर येथे कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या डागडुजीकरणाकडेही जिल्हा परिषदेने लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक स्थितीत उभी असून सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतीचा वापर बंद करण्यात आला आहे. मात्र येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे निवास्थान तसेच शवविच्छेन गृहाची इमारत जीर्ण झाली असून कोणत्याही क्षणी इमारतीचा भाग कोसळू शकतो. परिसरातील ग्रामस्थांनी आवाज उठविल्यानंतर येथे ग्रामीण रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे साचेबद्ध उत्तर देण्यात येते. मंजूर ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित होत नसल्याने आणि कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इतक्या मोठ्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना सेवा देताना कार्यरत डॉक्टरांची दमछाक होत आहे. 
 
वरिष्ठांना पत्र्यवहार 
- शवविच्छेदन गृहाची इमारात जीर्ण झाल्यामुळे छताला गळती लागली आहे. गृहाचा दरवाजा तुटलेला आहे. छत कधीही कोसळण्याची भीती असून याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे. -डॉ. सुधीर जोगदंड, वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र. 
 
किमान शवविच्छेदन गृहाची डागडुजी करावी 
शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्र येत असून परिसरात अपघात तसेच अन्य कारणाने कुणाचा मृत्यू झाल्यास मृताचे शवविच्छेदन या मरनासन्न अवस्थेतील खोलीतच करावे लागते. त्यामुळे किमान येथील शवविच्छेदन गृहाची डागडुजी करण्याचे गांभीर्य प्रशासनाने दाखविण्याची मागणी होत आहे. ग्रामीण रुग्णालयाला मंजुरीमुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरोग्य प्रशासनाने दुर्लक्ष केले असून रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. जीर्णावस्थेतील मुख्य इमारतीचा वापर बंद केल्याने प्रसूतीगृहातून आरोग्यसेवा देण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...