आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस बँक खाते काढून ८४ लाखांची झाली फसवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एकाभागीदारी फर्ममध्ये संयुक्तपणे बँक अकाउंंट असताना दोघांनी बनावट अकाउंंट काढले. तत्कालीन कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाने दोघांना मदत केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ८४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने जोडभावी पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. मधुसूदन सोनी (रा. चाटी गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.

सुभाष सोनी, मनमोहन सोनी (रा. दोघे चाटी गल्ली) या दोघांसह कॅनरा बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत हा प्रकार चाटी गल्ली आणि सरस्वती चौकातील कॅनरा बँकेत घडला आहे. तिघा सोनींमध्ये भागीदारीत फर्म होते. संयुक्तपणे खाते असताना दोघांनी बनावट खाते काढले. त्यांना बँकेत मदत करण्यात आली. ८४ लाख रुपये तिघांनी वापरले होते. याबाबत न्यायालयात खासगी फिर्याद देण्यात आली.
न्यायालयाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सहायक निरीक्षक चंद्रकांत माळी यांना विचारले असता, हा गुन्हा मॅजेस्टीक आहे. कागदपत्रांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत नेमके कुठले फर्म होते. काय प्रकार झाला आहे. याची माहिती समोर येईल. आता फक्त प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

चोवीस हजारांची आॅनलाइन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
आसराचौकातील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेतील खातेदार बसवण्णा गलाटे (रा. राघवेंद्रनगर, होटगी रस्ता) यांच्या अकाउंंटमधून चोवीस हजार रुपये आॅनलाइन काढण्यात आले आहेत. विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.

तीन आॅगस्ट रोजी गलाटे यांना मुख्य शाखा पुणे येथून फोन आला. पैसे कधी काढले आहेत. बँक अकाउंटही त्यांनी त्याच वेळी सांगितले. आॅगस्ट रोजी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर आॅनलाइनद्वारे पैसे काढून घेतल्याचे कळले. पोलिस निरीक्षक एन. बी. अंकुशकर यांना विचारले असता, ही फसवणूक आॅनलाइन आहे. त्याचे बँक डिटेल्स मागवले आहेत. आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. तपासाअंती चित्र समोर येईल.