आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुरात एनटीपीसी प्रकल्पात मोठी दुर्घटना; बॉयलर अंगावर पडून 4 कामगारांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अहिरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात लोखंडी बॉयलर अंगावर पडल्याने 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत कामगार बिहारचे होते. बॉयलरखाली आणखी कामगार दबले गेल्याची भीती वर्तवली जात आहे.

मिळालेली माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडीत एनटीपीसी प्रकल्प आहे. या प्रकल्पात क्रेनच्या मदतीने बॉयलरचे लोखंडी बीम बसवण्याचे काम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली.

पोलिस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मदतकार्य सुरु झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...