आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकांच्या माध्यमातून कैद्यांना मिळतोय मानसिक आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - येथील जिल्हा ग्रंथालयातून विविध नवनवीन पुस्तके कारागृहामध्ये वाचनासाठी पुरवली जात आहेत. कैद्यांकडून धार्मिक पुस्तकांना अधिक मागणी आहे.विविध प्रकारचे गुन्हे दाखल झालेले न्यायाधनि बंदी तसेच शिक्षा झालेले अनेक कैदी येथील जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत. कारागृह म्हणजेच त्यांचे जग आहे. बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो. अगदी एकटेपणाचे तसेच कंटाळवाने जीवन जगण्याची त्यांच्यावर वेळ आलेली असते. या दरम्यान काही कैद्यांच्या मानसिकतेत बदल झालेला असतो. केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप होत असतो. मात्र, एकदा शिक्षा झाल्यानंतर त्यांना ती भोगण्याशिवाय गत्यंतर नसते. अशा वेळी कैदी मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांना अपेक्षित असलेला मानसिक आधार देण्याचे काम येथील जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन कारागृहाला खातेदार बनवून घेतले आहे. यामुळे कैद्यांना सातत्याने चांगल्या पुस्तकांचा पुरवठा केला जात आहे. पुस्तके वाचून त्यांना मानसिक आधार मिळत आहे. सातत्याने नवीन पुस्तकांची मागणी कारागृहातून होत आहे. यामुळे कैद्यांसाठी नवीन २५ ते ४० पुस्तके महनि्याला पुरवली जात आहेत. पुस्तक वाचून झाल्यानंतर कैदी काळजीने पुस्तके परत करत आहेत. या उपक्रमामुळे कंटाळवाणा वाटणारा कैद्यांचा वेळही जातो. तसेच त्यांना मानसिक आधारही मिळत आहे. तसेच पुस्तकांमुळे कैद्यांचे मानसिक परिवर्तन होण्यास मोठी मदत होऊ शकते.

शासकीय धोरणानुसार पुरवठा
जिल्हाग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील कैद्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे. सातत्याने तेथे पुस्तकांची मागणी वाढत आहे. यामध्ये धार्मिक पुस्तकांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय धोरणानुसार त्यांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत आहे.'' गजाननकुरवाडे, ग्रंथालय निरीक्षक.

धार्मिक पुस्तकांना मागणी
कैद्यांकडूनसर्वात अधिक धार्मिक पुस्तकांना मागणी आहे. यामध्ये विविध ग्रंथांचे निरूपण, धार्मिक कथा, तत्त्वांचे महत्त्व अशा पुस्तकांचा समावेश आहे. धार्मिक पुस्तके वाचल्याने मानसिक प्रबळता प्राप्त होत असल्यामुळे अशा पुस्तकांची मागणी आहे. या खालोखाल स्व- समुपदेशनावर आधारित पुस्तके, कथा, कादंबऱ्या यांनाही प्राधान्य मिळत आहे.

२० हजार पुस्तके
सध्याजिल्हा ग्रंथालयामध्ये २० हजार ८०५ पुस्तके आहेत. यामध्ये धार्मिक, प्रबोधन करणारे, चित्रपटविषयक, कथा, कादंबऱ्या, संदर्भ ग्रंथ अशा आशयाची पुस्तके आहेत. तसेच स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करणारी पुस्तके आता वाढवण्यात आली आहेत. ग्रंथालयामध्ये सातत्याने वाचकांची संख्या वाढत आहे. महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे.