आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोरामणीजवळ बस धडकेत अणदूर येथील दोघांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आजारीबहिणीला रुग्णालयात भेटून परत गावी जाताना सिटीबसची धडक बसल्यामुळे दोघे तरुण मरण पावले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी बोरामणीजवळील सिंदगी मिलजवळ घडला.

सचिन श्यामराव गायकवाड (वय २६), कासीम मौला पिंजारी (वय ३५, रा. दोघेजण अणदूर, ता. तुळजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. सिटीबस (एमएच १३ एक्स ९६०६) नळदुर्गहून सोलापूरकडे येत होती. सचिन आणि कासीम दोघेजण दुचाकीवरून गावी जात होते. बोरामणीजवळ समोरासमोर धडक बसल्यामुळे दोघे गंभीर जखमी होऊन मरण पावले. सचिन याची बहीण आजारी असल्यामुळे त्यांच्यावर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना पाहण्यासाठी ते आले होते. दोघे मजूर म्हणून काम करीत होते. घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.