आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१०० अब्ज डाॅलरच्या पाण्यावर शंका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाण्याची बाटली खरेदी करताना आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे बाटलीवर एफएसएसएआयची मुद्रा आहे किंवा नाही. परंतु आता फूड अँड रेग्युलेटरने कडक भूमिका घेतली आहे. लवकरच बाजारात विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक ब्रॅन्डवर एफएसएसएआयची मुद्रा असणे बंधनकारक असणार आहे. पॅकेज्ड पाण्याचा धंदा जगभरात तेजीत असून तो १०० अब्ज डाॅलरवर पोहोचला आहे. आपल्या भारतामध्ये ही उलाढाल हजार कोटींवर पोहोचली आहे.
बाटलीबंद पाणी म्हणजे शुद्धता आणि स्वच्छतेची हमी अशी लोकांची धारणा असली तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे...
केवळ पॅकेज्ड फूडच नव्हे तर पॅकेज्ड पिण्याचे पाणी विकणाऱ्या कंपन्यांवरही फूड रेग्युलेटर एफएसएसएआयची करडी नजर राहणार आहे. राज्य सरकारांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणतीही पॅकेज्ड पाण्याची कंपनी एफएसएसएआयच्या परवान्याशिवाय चालवण्यात येऊ नये. आकडे सांगतात की देशात बाटलीबंद पाणी विकणाऱ्या जवळपास हजार कंपन्या आहेत. त्यातील केवळ १५०० कंपन्यांकडे परवाना आहे. फूड सेफ्टी कायद्यानुसार पॅकेज्ड पिण्याच्या पाण्यासाठी बीआयएस आणि एफएसएसएआय दोन्ही संस्थांकडून परवाना आवश्यक आहे. परंतु बहुतेक कंपन्या केवळ बीआयएसकडून परवाना घेतात. आता एफएसएसएआय ने स्पष्ट केले आहे की ज्या बाटल्यांवर त्यांना परवाना दिसणार नाही, त्या कंपन्यांवर कठोर कारवाई होईल.
पाण्याचा व्यापार !

पाणीबाटलीबंद आहे म्हणजे ते सुरक्षित आहे, अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळे लोक नळाच्या पाण्यापेक्षा पाच हजार पट अधिक किंमत देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करतात. जागतिक स्तरावर बाटलीबंद पाण्याचा धंदा १०० अब्ज डाॅलरपेक्षा अधिक आहे. एकट्या अमेरिकेमध्ये १२ अब्ज डाॅलर मिनरल वाॅटरची विक्री होते. जागतिक बाजारात हे प्रमाण १० टक्के इतके आहे.
साधारणपणे लोकांंना असे वाटते की घरांमध्ये नळातून येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत बाटलीबंद आणि हे अधिक स्वच्छ आणि शुद्ध असते. व्यावसायिक पद्धतीने पॅक करून विकण्यात येणारे पाणी शुद्ध आणि स्वच्छ असल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता कमी असते, असे वाटल्यामुळेच लोक नळाच्या पाण्यापेक्षा हजारो पट अधिक पैसे देऊन बाटलीतील पाणी खरेदी करतात. असे असले तरी इंग्लंडमध्ये झालेल्या एका तपासणीनुसार बाटलीबंद पाण्याच्या स्वच्छतेसंबंधीचे सर्व धारणा खोट्या असल्याचे पुढे आले आहे.

चाचणीत असे आढळले आहे की बाटलीबंद पाणी म्हणजे आरोग्यदायी राहण्याची गॅरंटी नाही. कारण यामध्ये नळाच्या पाण्यापेक्षा सुरक्षा परिमाणांकडे कमी लक्ष दिलेले असते. इंग्लंडमधील शहरांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार तेथील घरांमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या नळाच्या पाण्याची दररोज अनेक स्तरांवर तपासणी केली जाते. बाटलीबंद पाण्याच्या निर्मात्यांकडून मात्र महिन्यातून एकदाच पाण्याच्या स्रोताची चाचणी होते. त्यामुळे स्वाभाविकच बाटलीबंद पाण्यात अशुद्धी असण्याची शक्यता वाढते.

नळाच्या पाण्यातील संसर्गजन्य बॅक्टेरिया आदी नष्ट करण्यासाठी क्लोरिनचा वापर केला जातो. बाटलीतील पाण्याबाबतीत असे केले जात नाही. हे सर्वेक्षण इंग्लंडमधील परिस्थितीवर आधारित आहेत. आपल्या भारतातही असे अनेक सर्व्हे रिपोर्टस् आलेले आहेत, त्यानुसार भारतातील बाटलीबंद पाणी स्वच्छ आणि शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही.
जागतिक स्तरावरबाटलीबंद पाण्याची मागणी शीतपेयांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. कार्बोनेटेड प्राॅडक्टपासून ग्राहक लांब चालल्याचा ग्लोबल ट्रेंड भारतातही पाहायला मिळत आहे. युरोमाॅनिटर या संशोधन संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पॅकेज्ड पाण्याची भारतातील वाढ २३ ते २५ टक्के होती. ही वाढ सोड्याच्या दुप्पट आहे. तसेच अमेरिकेत या वर्षी बाटलीबंद पाण्याची विक्री पहिल्यांदाच सोडा विक्रीहून अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये पेप्सिकोच्या पाण्याच्या व्यावसायाची ग्रोथ २०१६ च्या पहिल्या तिमाहीत दहाच्या आकड्यात होती. दरम्यान, आरोग्याविषयी जागरूकता येत असल्यामुळे शीतपेयांचे उत्पादन टक्के घटल्याचे दिसून आले. युरोमाॅनिटर इंडियाचे कंट्री मॅनेजर जानकी पद्मनाभन यांच्या म्हणण्यानुुसार “शीतपेयांमध्ये साखरेचे अधिक प्रमाण आणि पोषक घटक नसल्यामुळे जगभर नकारात्मक प्रसाराला तोंड द्यावे लागत आहे. आरोग्याविषयी आणि आपल्या डाएटमध्ये पोषक घटक असतील, याबद्दल ग्राहक आता सजग झाला आहे.’ सध्या भारतामध्ये चार किंवा पाच मोठ्या कंपन्यांनीच पाण्याच्या धंद्यावर मक्तेदारी ठेवली आहे असे दिसते.

बाटलीबंद पाण्याची मागणी वाढल्याने देशात मिनरल वाॅटरला चांगले दिवस आले आहेत. देशातील सर्व पेय पदार्थांच्या कॅटॅगरीमध्ये पाणी, ज्यूस आणि कार्बोनेटेडचा प्रति व्यक्ती खप तसा कमी आहे. त्यामुळे येथे या सर्व कॅटॅगरीत वाढ होण्यास मोठा वाव आहे. युरोमाॅनिटरच्या मते, नाॅन कोला कार्बोनेटेड म्हणजे फ्रूट बेस्ड कार्बोनेटेडची मागणी तरुणाईमध्ये वाढताना दिसत आहे. घरातून बाहेर पडल्यावर पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळे मिनरल वाॅटर आणि ज्यूसला प्राधान्य मिळत आहे.

जास्त खर्चिक
जगभरातीलसुमारे २.२ कोटी टन बाटलीबंद पाण्याचा पुरवठा उत्पादन केलेल्या देशातून दुसऱ्या देशात केला जातो. अशावेळी पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशनमुळे हे अधिक खर्चिक होऊन जाते.

पर्यावरणासाठीही मोठे संकट
पाण्याचेपॅकिंग करण्यासाठी दरवर्षी सुमारे २७ लाख टन प्लास्टिक वापरले जाते. यातील अधिकांश प्लास्टिकचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे पर्यावरणासमोर फार मोठे संकट आहे.

जास्त पाण्याचा वापर?
एकानिरीक्षणानुसार एक बाटली पाणी पॅक करण्यासाठी किमान पाच बाटली पाण्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो. यामुळे विनाकारण नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येतो. पाण्याचा अपव्यय होतो.

असली कसली शुद्धता?
२००३मध्ये सीएसइ ने केलेल्या तपासणीनंतर बाटलीबंद पाण्यासाठी परिमाण निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली नाही. याचा अर्थ स्थिती सुधारणा झाली आहे असे म्हणता येत नाही. आताही ९९ टक्के बाटलीबंद पाण्याच्या सुरक्षिततेची हमी देता येणार नाही.

केमिकल्स मिसळतात
सुमारे४० टक्के बाटलीबंद पाण्यात नळाच्या पाण्याचाच वापर केलेला असतो. बाटलीबंद करताना त्यात मिनरल्स, लेवर आणि अनेक प्रकारची रसायने मिसळतात.
युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अनुसार संपूर्ण जगामध्ये जवळपास २.५ अब्ज लोकसंख्येला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. हे प्रमाण एकूण जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ३५ टक्के इतके आहे. प्रत्येक सहापैकी एक माणसाला ही समस्या भेडसावत आहे. शुद्ध पाणी मिळाल्याने झालेल्या विविध आजारांमुळे दररोज २२०० मुले दगावतात.

कीटकनाशक युक्त पाणी!
वर्ष २००३ मध्ये सेंटर आॅफ सायन्स अँड एनव्हिराॅन्मेंटने (सीएसइ) दिल्ली येथे विकण्यात येणाऱ्या बाटलीबंद पाण्याची चाचणी केली. यामध्ये नामवंत कंपन्यांच्या बाटल्याही होत्या. सीएसइने केलेल्या चाचणीत बाटलीबंद पाण्यात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा अंश आढळला होता. ही रसायने भूजलात कीटकनाशकांचे मोठे प्रमाण असल्याने बाटलीबंद पाण्यात उतरले होते.
बातम्या आणखी आहेत...