आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिशन अवयवदान’ : वडील म्हणाले, वंश संपला पण मुलगा चार जणांमध्ये अवयवरुपाने जगेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विनी ग्रामीण रुग्णालयातून ठरलेल्या वेळेत ‘हृदय’ पोहोचवण्यासाठी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते. - Divya Marathi
अश्विनी ग्रामीण रुग्णालयातून ठरलेल्या वेळेत ‘हृदय’ पोहोचवण्यासाठी सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले होते.
सोलापूर - आई-वडिलांनामी एकटाच होतो. मलाही एकुलता एक मुलगा. तो गेल्याने माझा वंश संपला आहे. तो शरीराने गेला असला तरी अवयवरूपाने चार जणांमध्ये जिवंत राहणार आहे. या अवयवदानाचा उपयोग गरजू आणि गरीब व्यक्तींना होईल. अवयवदानाचे महत्त्व समजाला पटावे यासाठी मी स्वत: अवयव दान करणार होतो. परंतु माझ्याआधीच मुलाचे अवयवदान झाले. यामुळे माझे जीवन सार्थक झाले. हे सांगताना गणेशचे वडील शिवशंकर कोळी यांचा गळा अवरूद्ध झाला अन् डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ज्यांना अवयव दिले जाणार आहेत, त्या व्यक्तींना मला भेटण्यास मिळावे ही इच्छा आहे, असे ते म्हणाले. 
 
ब्रेनडेड झालेल्या गणेश ऊर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी (वय १४, रा. शाहूनगर, उस्मानाबाद) याच्या अवयवदानामुळे रविवारी चौघांना जीवनदान मिळाले. त्याच्या दोन किडनी, लिव्हर आणि हृदयाचे पुणे सोलापुरातील कुंभारीच्या अश्विनी रुग्णालयामध्ये दान करण्यात आले. किडनी आणि लिव्हरसाठी सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला तर हृदय पुणे येथे घेऊन जाण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर बातमी...
 
बातम्या आणखी आहेत...