आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलचा गुरुवारी एक दिवसीय संप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - देशातील बीएसएनएलमधील अधिकारी कर्मचारी युनियन असोसिएशनच्या वतीने १५ डिसेंबर रोजी लाक्षणिक संप करण्याचे ठरविण्यात आले आहे.

दूरसंचार सेवेतील सार्वजनिक उद्योगातील प्रमुख पाच ते सहा कंपन्यांपैकी बीएसएनएल ही सरकारी कंपनी असून त्या कंपन्यांचे तीन ते चार उपकंपन्यात विभाजन करण्याचा केंद्र शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी हा एकदिवसीय संप होत आहे. यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या युनियन असोसिएशनने सहभाग घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून ब्रॉडबँड साठी बीबीएनएल, ऑप्टिकल फायबर केबलसाठी नोफान, टॉवर्ससाठी सबसिडरी टॉवर कंपनी असे ठरविले आहे. बीएसएनएलचे देशात ६५ हजार टॉवर्स आहेत. दोन-चार वर्षांपासून व्हीएसएनल ही कंपनी यासाठी काम करत होती. ती कंपनी बीएसएनएलने टाटा कंपनीला ६७५ कोटी रुपयांना विकली.

आता कर्मचाऱ्यांना धास्ती आहे की, सबसिडरी टॉवर कंपनीमुळे आपल्या नोकरीस धोका आहे. भविष्यात ३५ हजार टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. मागील वर्षी देशांतर्गत बीएसएनएलला ६७५ कोटींचा तर यंदा हजार ८५५ कोटी नफा आहे. यापूर्वीही भूमिगत केबलमधील शिल्लक केबल विकण्याचा डाव होता, तो कर्मचारी अधिकाऱ्यांनी हाणून पाडला होता. आताही पूर्वनियोजन माहिती देता असे प्रकार चालू असल्याने हे आंदोलन संप होणार आहे. १५ डिसेंबरला संपूर्ण देशात हा संप होत आहे. ही माहिती नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉईज युनियन (बीएसएनएल, महाराष्ट्र सर्कल) चे राज्य निमंत्रक पांडुरंग आदोने यांनी दिली आहे. या संपात एनएफटीई, बीएसएनएल ई. यू, सेवा, स्नेहा, बीएसएनएल ई. या प्रमुख पाच संघटना सहभागी होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...