आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बुद्धवनम्’च्‍या महास्तुपासाठी सोलापूरची प्रतिभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तेलंगणासरकारच्या वतीने नलगोंडा जिल्ह्यातील नागार्जुन सागर येथे एक महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प उभा करण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या डाव्या तीरावर तब्बल २७९ एकरवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. हा परिसर बौद्ध परंपरेतील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे बौद्ध कलेशी संबंधित वास्तू अवशेष, वस्तू, नाणी, आदी सापडलेल्या आहेत. सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पाचे काम आर्टमॉर्फ कंपनीकडे देण्यात आले आहे. डिजिटल डिझाइनचे काम श्रेष्ठा अनिमेशन स्टुडिओकडे देण्यात आले होते. त्यामार्फत काही महिने दीपक पिंपळे याने काम केले. त्यानंतर स्टुडिओने काम थांबवले. त्यामुळे प्रकल्पाचे डिझाइन प्रमुख श्याम यांनी थेट दीपकशी संपर्क साधून काम पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला बरेच काम दीपकने केले होते. त्याचा अनुभव पाहता काम पूर्ण करण्यास एस. श्याम यांनी सांगितले. अशा पद्धतीने दीपककडे सर्व काम आले. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुच्या वडिलांची अार्ट अनिमेशन प्रशिक्षण संस्था हैदराबाद येथे आहे. तेथून त्याने अॅनिमेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. गेल्या अकरा वर्षांत त्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी काम केले आहे.
सम्राट अशोकाच्या काळात (इसवी सन पूर्व दुसरे शतक) अमरावती येथे महास्तूप बांधण्यात आले. त्याची प्रतिकृती बुद्धवनम् पार्कमध्ये उभी केली जात आहे.
जातक कथेवर आधारीत प्रसंगाचे संगणकीय रेखाटन केल्यानंतर त्याच्या आधारे वालुकाश्म दगडात कोरलेले शिल्प.

‘बुद्धवनम्’पार्कमध्ये अमरावती स्तुपची प्रतिकृती उभी केली जात आहे. याच्या शिल्पांचे संगणकीय रेखाटन सोलापूरच्या दीपक पिंपळे याने केले आहे.
युवा कलाकार दीपक पिंपळे याने साकारले संगणकीय रेखाटन
जातक प्रसंगाचे डिजिटल डिझाइन
अमरावती स्तूप
अमरावती स्तूपची प्रतिकृती नागार्जुन सागर येथील बुद्धवनम थीम पार्कमध्ये उभी केली जाते. त्यावरील शिल्पांचे संगणकीय रेखाटन (कॉन्सेप्ट डिझाइन)चे काम सोलापुरातील युवा कलाकार दीपक पिंपळे याने केले आहे.
तेलंगण सरकारचा प्रकल्प, अमरावती स्तूपाची प्रतिकृती, धम्मचक्र प्रवर्तन, जातककथा आदी शिल्पांचा समावेश
तब्बल दोन वर्षांची मेहनत
दीपकनेतयार करून दिलेल्या रेखांकनानुसार वालुकाश्म दगडावर शिल्प करण्यात येणार आहेत. त्याला अमरावती येथील प्रसिद्ध स्तुपावरील शिल्पांचे छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याच्या आधारे त्याने संगणकीय रेखाटन केले आहे. स्तुपाशिवाय, जातककथेची शिल्पे, ध्म्मचर्क प्रवर्तन शिल्पही त्याने रेखाटलेले आहेत. सुमारे दोन वर्षे त्याने यावर काम केले.
समाधानाची बाब
प्रचंडमोठ्या ‘बुद्धवनम्’ प्रकल्पासाठी काम करणे ही मोठी समाधानाची बाब आहे. अमरावतीचे स्तूप, जातक कथा आदी हुबेहुब संगणकावर डिझाइन करणे आव्हानच होते.”
दीपकपिंपळे, आर्टडिझाइनर
दीपक पिंपळे,
आर्टडिझाइनर
काय असेल बुद्धवनममध्ये?
बुद्धचरितवनम,बोधिसत्त्व वनम, ध्यानवनम, स्तूप वनम, कृष्णा खोरे, तेलुगु भाषक प्रदेशातील बौद्ध परंपरचा वारसा सांगणारी प्रतीके उभी करण्यात येत आहेत. त्यात अमरावती येथील स्तुपच्या आकार-प्रकारातील हुबेहुब प्रतिकृतीचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध बौद्ध तत्त्वचिंतक आणि मध्यमिका बौद्धधमाचे संस्थापक, आचार्य नागार्जुन यांच्या नावाने आंतराराष्ट्रीय बौद्ध शिक्षण केंद्र असणार आहे. याशिवाय ३५ एकरावर विपश्यना केंद्र बांधण्यात येणार आहे. त्या‌शिवाय अन्य पुरक वास्तू या केंद्रात असतील.
बातम्या आणखी आहेत...