आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका अंदाजपत्रक, पालिकेच्या 150 कोटींच्या हिश्श्याचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या नव्या सभागृहात आगामी वर्षाचे सुमारे ९६० कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत १३१ कोटी रुपयांची यात वाढ दिसते. महापालिकेचे उत्पन्न ३३.२४ टक्के आहे. तर तब्बल ६६.७६ टक्के रकमेची तरतूद केंद्र-राज्य सरकारच्या अनुदानावर आहे. कोणतेही नवे कर किंवा दरवाढ सूचवलेली नाही. वेगवेगळ्या योजनेत महापालिकेच्या हिश्श्याचे १५० कोटी रुपये देणे आहे. ते कोठून येणार, असा प्रश्न आहे.
 
विकासकामांकरिता ११० कोटी १५ लाखांची तरतूद आहे. कर्मचारी वेतनावर १७४ कोटी १० लाखांची तरतूद आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी ५० कोटींची तरतूद मागील वर्षी केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नाही. पुन्हा यावर्षी ५० कोटींची तरतूद केली आहे. महसूल निधीतून १२८ कोटी ७५ लाखांची कामे सुचवण्यात आली आहेत. 

महापालिका आयुक्त विजयकुमार काळम यांनी यांनी २८ फेब्रुवारी रोजी टपाली पद्धतीने अंदाजपत्रक सभेेपुढे ठेवले आहे. महापालिकेत सत्तांत्तर झाल्यानंतर भाजपचे नवे सत्ताधारी  यांचे हे पहिले अंदाजपत्रक आहे. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा कितपत यात समावेेश होऊ शकेल, हे पुढे सभागृहात कळेल.

ठळक वैशिष्ट्ये
- मलजल साफ करून एनटीपीसीला 
- उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी 
- जीआयएस प्रणालीने कर आकारणी 
- मालमत्ता करांची वेबसाइट करणे 
- आॅनलाइन जन्म-मृत्यू दाखले देणे
- वैयक्तिक, सामूहिक शौचालय बांधणे 
- अमृत अभियान राबवणे 
- भाजपस अडचणी येणार
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, पैसा कसा येणार आणि कसा खर्च होणार... 
बातम्या आणखी आहेत...