आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हशी पळवण्यांचा कार्यक्रम, नागरिकांची त्रेधातिरपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आषाढ निमित्तदरवर्षीप्रमाणे शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील गवळी समाजाच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलसमोर उत्साहात पार पडला. यामध्ये समस्त गवळी समाजातील तरुण, अबाल, वृध्दांचा सहभाग होता. महालक्ष्मी आषाढी यात्रेनिमित्त समाजबांधवांच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल मधील महालक्ष्मी देवीला पहाटे दरवर्षीप्रमाणे अभिषेक करण्यात आला. १३ रोजी समस्त गवळी समाजबांधवांच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल येथील महालक्ष्मी मंदिरात अभिषेक करीत दिवसभर दूध, दही आणि केळी जमा केले. रात्री पारंपरिक गाणी म्हटली गेली. १४ रोजी पहाटे देवीची आरती करण्यात आली. अभिषेका नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी महापौर सुशीला आबुटे,भारत परळकर, देवबा डोईजोडे, अनिल गवळी, बाबा परळकर, केशव झिपरे, प्रभाकर हुच्चे, दत्ता परळकर, राजा परळकर आदी उपस्थित होते.

रंगभवन ते पोटफाडी चौकापर्यंत म्हशी पळविण्याचा कार्यक्रम रंगला. म्हशींच्या शिंगांना लाल रंगांने रंगवून मोरपिस लावण्यात आले होते. म्हशींना पळविण्यासाठी हलगी वाजण्यात येत होती. तसेच, सिव्हिल चौकात म्हशी येताच फटाके फोडण्यात येत होते. यामुळे म्हशी बेभान होऊन पळत होत्या.
सिव्हिल चौकाकडे
येणाऱ्या चारही रस्त्यावर वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी तैनात होते. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना ते पर्यायी मार्ग दाखवित होते. तरीही चाेरून जाणाऱ्यांचे मात्र गर्दीत हाल झाले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..