आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणार पोर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विमानतळावर प्रवाशांना उतरवण्यासाठी किंवा त्यांना घेऊन जाण्यासाठी ज्या पध्दतीचे पोर्च असते त्या पध्दतीचे पोर्च सोलापूर रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणार आहे. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीत बदल करण्यात येणार असून रेल्वेस्थानकाच्या पायारीवरच्या जागेजवळ मोठा पोर्च बांधला जाणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्यात प्रवाशांना वाहनांतून उतरताना चढताना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, स्थानकावर दुचाकी वाहनतळांचीही समस्या जाणवत असल्याने हा प्रश्नही लवकरच सोडवण्याचे संकेत सोलापूर रेल्वे विभागाचे नूतन अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थाापक मनिंदर सिंग उप्पल यांनी दिले.
सोलापूर विभागाचा पदभार घेतल्यानंतर श्री. उप्पल यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली.पाहणीवेळी त्यांना पोर्चची कमतरता आढळून आली. प्रवाशांच्या सोयीसाठी पोर्चचे काम तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. सोलापूर स्थानकावर पोर्च नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागतो.ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन विमानतळावर असलेल्या पध्दतीचे पोर्च रेल्वे स्थानकावर बांधणार आहे.

पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करणार
चारचाकी वाहनातून येणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी रांग असणार आहे. संबंधित प्रवासी गाडीतून उतरल्यानंतर लागलीच वाहनधारकांना आपले वाहन पुढे घेऊन जावे लागणार आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होणार नाही. तसेच जुन्या मालधक्क्याच्या ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या सोलापूर रेल्वे स्थानकावर दुचाकी चारचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. परंतु बरेच वाहनधारक वाहनतळावर वाहने लावता स्थानकाच्या पायऱ्यांजवळ अथवा आरक्षण केंद्रासमाेर वाहने लावतात. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर जाणे अथवा बाहेर येणे मुश्किलीचे बनले आहे.

लवकरच काम हाती घेऊ
^सोलापूर रेल्वे स्थानकावर पोर्च उभारण्यात येणार आहे. यासाठी नेमका किती खर्च येईल हे आताच सांगता येणार नाही. हे काम लवकरच हाती घेण्यात येईल. तसेच, पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. मनिंदरसिंग उप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक