आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिल्डरच्या ताब्यात असलेले घर स्वमालकीचे करणे झाले सुकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बिल्डरने बांधून दिलेली घरे स्वामालकीची करून घेण्यात किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात काही अडचणी होत्या. शासनाने त्या दूर केल्या आहेत. पूर्वी अर्जासोबत १२ कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक होते. आता त्याची संख्या आठवर आणण्यात आली.

याशिवाय या अर्जाची एक प्रत मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयात द्यावी; जेणेकरून हस्तांतरणास गती मिळेल, असे गृहनिर्माण विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले अाहे.

सहकार आयुक्त आणि निबंधक चंद्रकांत दळवी यांनी या सुधारणेला मान्यता दिली आहे. त्याचा आदेश गृहनिर्माण विभागाने मंगळवारी काढला. जमिनीवरील अाणि इमारतीतील घराचे हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध यांचे हस्तांतरण करण्यासाठी हा सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

बिल्डरने इमारत बांधल्यानंतर त्यातील घरांचा मालकी हक्क देत नाही. इमारतीतील सदनिकाधारक एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था स्थापन करत असल्यास त्यांच्याकडे अभिहस्तांतरण (कन्व्हेन्स डीड) करून देणे बिल्डरवर बंधनकारक अाहे. असे असतानाही अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या नावे अभिहस्तांतरणाचे पत्र दिले जात नाहीत. त्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अनेक वेळा करण्यात आलेला आहे. त्यामुळेच बिल्डरांच्या या प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या हस्तांतरणाचा हक्क मिळवून देण्यासाठी मानीव अभिहस्तांतरणाची संकल्पना मांडली आहे.

आता सुलभ झाले
अभि हस्तांतरणासाठीपूर्वीच्या नियमांत काही अडचणी होत्या. बिल्डरकडून कागदपत्रे मिळवणे शक्यच नव्हते. आता ठरलेल्या आठ कागदपत्रांमध्ये बिल्डरांचा संबंध उरलेला नाही. त्यामुळे अभिहस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
-मदन तोरवी, विकासगृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी संचालक

आता ही आठ कागदपत्रे द्या
१. मानीव अभिहस्तांतरणासाठी ‘मोफा’ कायद्याच्या नियमामधील नमुना मधील अर्ज.
२. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीचा अर्ज किंवा कंपनी नोंदणी प्रमाणपत्र प्रत.
३. बिल्डरने मंजूर करून घेतलेला लेआऊट, जमीन गट क्रमांकाचा सातबारा उतारा.
४. प्रत्येक सभासदाच्या सदनिका विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स, हक्काचा पुरावा.
५. सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतरणासाठी दिलेली नोटीस
६. सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची सविस्तर यादी
७. महापालिका अथवा नगरपालिकेकडून बांधकाम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अत्यावश्यक
८. जमीन हस्तांतरणासाठी किंवा बिनशेती करण्यासाठीच्या परवानगी आदेशाची प्रत.
बातम्या आणखी आहेत...