आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळे येथे घरफोडी; ३७ तोळे दागिने, इतर साहित्य पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आजारी आईला भेटण्यासाठी अक्कलकोटला गेल्यानंतर चोरांनी घरातील ३७ तोळे दागिने, हजार रुपये, डेबीट क्रेडिट कार्ड पळवले. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाला उघडकीस अाली. सौ. अश्विनी राहुल सासवडे (रा. डांगेनगर, बाळे) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली अाहे.
सौ. अश्विनी यांच्या सासूची अाई अाजारी असल्यामुळे घरातील सर्वजण गुरुवारी सायंकाळी अक्कलकोटला गेले होते. शुक्रवारी पहाटे शेजारी राहणाऱ्या पाटील यांना घर फोडल्याचे लक्षात अाले. त्यांनी माहिती दिल्यावर सासवडे घरी अाले. फौजदार चावडी पोलिसांचे पथक अाले. श्वान पथक बार्शी रोडच्या दिशेने जाऊन थांबले.

अश्विनी सासवडे यांचे पती पुण्यात खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात तर सासरे शासकीय दूध डेअरीत अधिकारी म्हणून निवृत्त झाले. घरात कुणीच नसल्याची संधी साधून चोरांनी डाव साधला.

असा होता ऐवज
तोळेगंठण, तोळे गळ्यातील ठुशी, दीड तोळे बाजूबंद, चार तोळे पाटल्या, चार तोळे हातातील जोडे, एक तोळ्याचे गळ्यातील जोंधळी पोते, सात तोळ्याचे सोन्याचे चार लाॅकेट, दीड तोळ्याचे ब्रेसलेट, पाच तोळ्याचे काही अंगठ्या, सोन्याचे गंठण, सहा तोळे चांदीचे दागिने.

तीन पथके नेमली
^घटनास्थळाची पाहणीकरून या पद्धतीने चोरी करणारी टोळी कुठली अाहे याचा तपास सुरू केला अाहे. सुमारे तीन पथके नेमण्यात अाली अाहेत. सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला अाहे. लवकरच चोरटे जाळ्यात येतील. गुन्हे शाखा फौजदार चावडीचे पथक यावर काम करीत अाहे. -सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...