आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसस्थानक विकास अन् टाॅवेल्सला करमाफी, नुसत्याच घोषणा असल्याची काँग्रेसची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात सोलापूर विमानतळ, बसस्थानकाच्या विकासासाठी तरतूद करण्यात अाली अाहे. तसेच टाॅवेल्स अाणि चादर उत्पादनावरील करातही सवलत कायम ठेवली अाहे. त्यामुळे या वर्षात तरी सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार, अशी अाशा निर्माण झाली अाहे. तर सोलापूरचे बसस्थानकही अाता कात टाकेल. दरम्यान, अंदाजपत्रकावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने केवळ घोषणा अाहेत, तरतुदीचा पत्ताच नाही अशी टीका केली अाहे. तर भाजपने सोलापूरच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगून स्वागत केले अाहे.

सोलापूर, शिर्डी, कराड विमानतळ विकासासाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. यातील सोलापूरच्या वाट्याला किती येतील हे माहिती नाही. मात्र, सोलापूरच्या बोरामणी येथील विमानतळासाठी कंपनीची स्थापना झाली अाहे. भूसंपादनाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात अाहे. केवळ निधीची गरज अाहे. होटगी रोडवरील विमानतळ विकासासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात अाले अाहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकामध्ये अत्याधुनिक सोईसवलती उभारण्यात येणार आहेत. सोलापूरचे बसस्थानक बसपोर्ट म्हणून विकसित करणार अाहेत. ते बीअोटीवर असेल, पण अंदाजपत्रकात त्याबाबत स्पष्टता केलेली नाही. सध्या पांजरापोळ येथील बसस्थानक जुना पुणे नाका येथील जागेवर होणार अाहे. पूर्ण नवीनच बसस्थानक उभारण्याचा प्रयत्न अाहे. पण सध्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद झाली अाहे. अाहे त्या बसस्थानकाचाच विकास केला जाणार अाहे. गोवंश रक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात भाकड गोवंश संगोपन करण्यासाठी गोवंश गोवर्धन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचा फायदाही सोलापूरला होईल.

टाॅवेल्सवर कर
सोलापुरी चादर आणि सर्वसामान्य वापरत असलेले टाॅवेल्स या सोलापूर नगरीच्या खास उत्पादनांना गतवर्षीप्रमाणे यंदाही करमाफी देण्यात आली अाहे. मात्र हाॅटेलमध्ये वापरण्यात येत असलेल्या टेरी टाॅवेल्सवर ५.५ टक्के मूल्यवर्धित कर लावण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले.

कृषी
>जिल्ह्यात कृषीमहोत्सव होणार
>सेंद्रीय शेतीच्या चळवळीला गती
>सक्षमहवामानकेंद्र उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना हवामानातील बदलांचा अचूक अंदाज मिळण्यास मदत होईल.
>नाबार्डच्यामाध्यमातूनदुग्धोत्पादन प्रकल्प सुरू होणार
>शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटींच्या विशेष तरतुदींचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा
ग्रामविकास
>मुख्यमंत्री ग्रामसडकयोजनेद्वारे ग्रामीण रस्त्यांची कामे होतील.
>ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे.
>पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र १०० कोटींची तरतूद
>(स्व.)बाळासाहेबठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत महिला सक्षमीकरण अभियानासाठी एक हजार कोटींची तरतूद आहे.
>ग्रामीणभागाच्याविकासासाठी स्मार्टग्राम योजना राबविली असून त्याचा फायदा ग्रामविकासाला होईल.
शेतीसाठीराज्याचे बजेट दिलासा देणारे आहे. पण, त्या तरतुदींचा थेट शेतकऱ्यांना किती फायदा होईल? हा अभ्यासाचा विषय आहे. जलयुक्त शिवार इतर तरतुदींमुळे अप्रत्यक्ष फायदा होईल. मोफत खते बियाणे देण्याची योजना चांगली आहे. फळबागांसाठी काहीही ठोस तरतुदी नाहीत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी प्रक्रिया पशुपालनाच्या जोडव्यवसायासाठी विशेष तरतूद गरजेची होती. डॉ. चनगोंडा हविनाळे, प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष
टाॅवेलवरील व्हॅटसंदर्भात संदिग्धता आहे. हॉटेलला लागणाऱ्या टॉवेलवर ५.५ व्हॅट, सामान्यांसाठी लागणाऱ्या टॉवेलला व्हॅट नाही, असे मुद्दे समजले आहेत. यामुळे सोलापुरातील टॉवेल उद्योगावर वाईट परिणाम होतील. चादरीवर पूर्वीही व्हॅट नव्हता आणि आत्ताही लावण्यात आला नाही. पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष,सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ
बातम्या आणखी आहेत...