आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध पाण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा तेजीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दूषितपाण्यावर पर्याय म्हणून सध्या वॉटर प्युरिफायर, आरओ प्लांट्स, मिनरल वॉटर आदींकडे नागरिकांचा कल वाढला आहे. वास्तविक शुद्ध पाणी देणे ही सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. नागरिकांनीही आपल्या सांडपाण्यामुळे नदी, नाल्यांचे पाणी अशुद्ध होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन्ही पातळ्यांवर हे प्रयत्न होत नसल्याने सध्या शुद्ध पाण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे.

नळ, बोअरवेलला अशुद्ध पाणी येत असल्यामुळे बाजारपेठेत घरगुती वॉटर प्युरिफायर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते आहे. आज देशातील वॉटर प्युरिफायरच्या शुद्धीकरणासंदर्भात कोणतेही किंवा खास असे ठोकताळे निश्चित केलेले नाहीत. हे ठोकताळे नेमके काय असावेत, याबाबत अजूनही संशोधन सुरूच अाहे. त्याबाबत योग्य ती अंमलबजावणी झाल्यास अतिसूक्ष्म जीवाणू (मायक्रोबायोलॉजिकल बॅक्टेरिया) शुद्ध करणाऱ्या वॉटर प्युरिफायरची किंमत आणखी कमी झाल्याचे आढळून येईल. स्टँड-अलोन कॅण्डल फिल्टर्समधील शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान हे मायक्रोफिल्टरेशनवर आधारलेले असते, जे पाण्यातील विषाणू काढत नाहीत आणि त्याचबरोबर साध्या कार्बन फिल्टर्समध्येदेखील आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांचा जीवाणू, विषाणू आणि जंतूंना नष्ट करण्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित केला जाईल. आरओ (रिव्हर्स ऑसमोसिस) तंत्रावर आधारलेले वॉटर प्युरिफायर्स चांगलेच लोकप्रिय असलेले दिसून आले आहे. भारतामध्ये त्या त्या ग्राहक वर्गाला परवडतील आणि त्याच्या जीवनशैलीला शोभतील असे निम्न, मध्यमवर्गीय आणि उच्च आर्थिकस्तर असलेले ग्राहक लक्षात घेऊन त्यानुसार काही वॉटर प्युरिफायर बनवलेले जातात.
वस्त्रगाळ कापडाचा दररोज वापर करता येईल.
केळीच्या सालीने शुद्ध
पिण्याच्यापाण्यात असणारे आरोग्याला हानीकारक धातू शोधण्यासाठी केळीच्या सालींचा वापर फायदेशीर दिसून आला आहे. याबाबत ब्राझील येथील शास्त्रज्ञांनी विशेष संशोधन केले आहे. हे "इंडस्ट्रिअल अँड इंजिनिअरिंग केमिस्ट्री रिसर्च' या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. नदीच्या पाण्यामध्ये शिसे, तांबे या धातूंचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण दिसून येते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सिलिका, अॅल्युमिना आणि सेल्युलोज या सुधारित रासायनिक घटकांचा वापर होत असतो. हे सर्व रासायनिक घटक महाग आहेत, त्याचबरोबरीने यांचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला तरीही काही प्रमाणात विषारी घटक पाण्यात राहतात. त्यामुळे हे प्रदूषित घटक कशा पद्धतीने पाण्यातून काढून टाकता येतील. याबाबत तज्ज्ञ संशोधन करीत असल्याचे ब्राझीलमधील बोटूकटूमधील बायोसायन्स इन्स्टिट्यूटचे गुस्ताव कॅस्ट्रो यांनी जाहीर केले आहे. केळीच्या सालींमधील घटकांमध्ये जड धातूंना बांधून ठेवणारी प्रथिने असतात. केळीच्या साली वाळवून त्याची पावडर शिसे, तांबे यांसारख्या धातूंमुळे प्रदूषित पाण्यात मिसळून काही मिनिटे ढवळली. त्यानंतर केलेल्या विविध परीक्षणांमध्ये असे दिसून आले की, सालीच्या पावडरमुळे पाण्यातील धातूचे प्रमाण कमी झाले आहे. डॉ. अशोक मंत्री
याचीही मागणी वाढणार...
येत्याकाही वर्षांत असे ग्राहक पर्यावरणावर आधारित वॉटर प्युरिफायर तंत्राची मागणी करतील. पाणी उकळवणे आणि ग्रीन हाऊस गॅस तंत्रावर आधारलेले पाणी बाटलीत भरणे, यापेक्षा वॉटर प्युरिफायरचे तंत्र खूपच अद्ययावत आहे. हलकेसे प्लास्टिक आणि कार्बन तंत्रावर आधारित शुद्धीकरण, असे शुद्धीकरण ज्यात प्लास्टिकचा पुनर्वापर शक्य आहे आणि ज्यात विजेचादेखील मोठ्या प्रमाणात वापर होत नाही, असे वॉटर प्युरिफायर निश्चितच लोकप्रिय ठरतील.

तरल आयोडिनच्या साहाय्यानेही पाणी शुद्ध करता येते.
माठात दोन थेंब मेडिक्लोर टाकणे. साठवण्याच्या पाण्यात मिनिटे तुरटी फिरवणे.
पाणी किमान दोनवेळा उकळून, गाळून पिणे.