आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने गळफास; हॉटेल ध्रुवमध्ये 15 नोव्हेंबरची घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पंढरपूर येथील एका व्यावसायिकाने येथील हॉटेल ध्रुवमध्ये १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर गुन्हा दाखल झाला. यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने फिर्यादीच्या राहत्या घरी जाऊन फिर्याद घेतल्याने विलंब झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. 


पंढरपूर येथील जिजाऊ नगरातील मंगेश जाधव यांनी सोलापुरातील हॉटेल ध्रुवमध्ये दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर २०५ मध्ये पंख्यास सुती दोरीच्या सहायाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात कारणावरून आत्महत्या अशी नोंद १५ तारखेला झाली होती. यानंतर त्यांची पत्नी स्मिता मंगेश जाधव (वय ४०, रा. जिजाऊ नगर, पंढरपूर) यांच्या फिर्यादीनुसार २२ नोव्हेंबर रोजी सदर बझार पोलिसांत गुन्हा नाेंद केला. फिर्यादीत म्हटले आहे की, पती मंगेश यांनी आरोपी भारत कोळी (रा. पंढरपूर) यास एक वर्षापूर्वी दोन लाख ६४ हजार रुपये उसने दिले होते. ती रक्कम परत मागितल्याने आरोपी भारत याने अरेरावी दमदाटी केली. मुलांना त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. हात उसने दिलेली रक्कम परत देता बुडवायच्या उद्देशाने दहशत निर्माण केली. आर्थिक मानसिक त्रास दिला. यास कंटाळून पती मंगेश यांनी त्याच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...