आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ हजार रुपयांत विद्यार्थ्याची वर्षभर निवासाची केली जाते सोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर  : ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदकडून गेल्या ३८ वर्षांपासून वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. केवळ हजार रुपयामध्ये विद्यार्थ्याची वर्षभर राहण्याची सोय करून देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवण्याचा हा उपक्रम महाराष्ट्रात एकमेव ठरला आहे. शहरात जवाहरलाल नेहरू वसतिगृह, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह अाहे. पंढरपुरात एक वसतिगृह असून, या तिन्ही वसतिगृहांमध्ये मिळून ७९२ विद्यार्थी निवस करत आहेत. 
 
या उपक्रमाप्रमाणे ठाणे सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने असा प्रयत्न झाला होता. परंतु तो यशस्वी झाला नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नामदेवराव जगताप यांनी १९७६ ला वसतिगृहांसाठी शासनाची मान्यता घेतली. १९७८ मध्ये वसतिगृहास प्रत्यक्षात सुरुवात झाली. या जागेत सुरुवातीला पशुवैद्यकीय दवाखाना होता. त्याच सहा खोल्यांमध्ये वसतिगृहाची सुरुवात झाली होती. १९७८ ते १९९१ पर्यंत शासनाच्या अनुदानावर वसतिगृह चालत होते. त्यावेळी पंचायतराज समितीने आक्षेप घेत शासनाकडून मिळणारे अनुदान रद्द केले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून चालवा, असे सांगितले. तेव्हापासून आजतागायत वसतिगृह व्यवस्थित चालू असून, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना निवारा मिळत आहे. 
 
घडले अनेक विद्यार्थी 
या वसतिगृहामुळे मागील चार दशकांत अनेक विद्यार्थी घडले आहेत. वसतिगृहातील विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आमदार दिलीप माने, सभापती राहुल क्षीरसागर हे या वसतिगृहामध्ये राहिले आहेत. दरवर्षी पोलिस सेवेत विद्यार्थी जात आहेत. हजारो विद्यार्थी शिक्षक झाले आहेत. नव्याने यशवंतनगर येथे होईल वसतिगृह .
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी वाचा....
बातम्या आणखी आहेत...