आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात १०१ रुपयांत आले इको फ्रेंडली बाप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सर्वत्र इको फ्रेंडली बाप्पाची क्रेझ सुरू अाहे. येथील बचत गट आणि महिला मंडळांनी स्वस्त आणि मस्त इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्ती आणल्या आहेत. विशेष म्हणजे या मूर्ती उंचीने एक वितापेक्षा कमी असून अष्टविनायक प्रकारातील आहेत. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला अाहे. बाजारात सर्वत्र विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीस आहेत. शाळा, कॉलेजातूनही अशा प्रकारच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. या मूर्ती पर्यावरणपूरक असून पाण्यात विरघळणाऱ्या आहेत.

बाळीवेस, काडादी हॉस्पिटल जवळील शिव-कृपा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने यंदाही इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या असून घरगुती मंडळांसाठीच्या दीड ते दोन फूट उंचीच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे अष्टविनायक प्रकारातील या मूर्ती असून केशरी-शेंदरी रंगातील या मूर्ती आहेत. यज्ञोपवित, कोरीव उंदीर, डावी सोंड नैसर्गिक रंग हे याचे वैशिष्ट्य आहे. हाताच्या एक वितापेक्षा उंचीने कमी असणाऱ्या छोट्या मूर्ती देव्हाऱ्यात ठेवण्यायोग्य आहेत. शिवाय माफक किंमत ठेवल्याने या मूर्तींना मागणी असल्याचे अध्यक्ष मधुर सोलापूरकर यांनी सांगितले. घरामध्येच या मूर्ती विक्रीस असून ९६८९६९४६८९ हा त्यांचा क्रमांक आहे. मागील तीन वर्षांपासून या संस्थेचा उपक्रम असून, सामान्यांनाही अशी निसर्गपूरक मूर्ती खरेदी करता यावी हा यामागचा उद्देश आहे.

घरात विसर्जन करा
मूर्तीमध्ये शेंदूर, यज्ञोपवितासाठी विभूती, डोळ्यांसाठी उंदरासाठी काजळ आदींचा वापर करण्यात आला आहे. घरातल्या घरात पाण्याच्या बादलीत विसर्जन करता येते. सुबक आणि शास्त्रशुद्धरीत्या मूर्ती आहेत.
बातम्या आणखी आहेत...