आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखांचे बनावट दागिने देऊन फायनान्सला गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तीन लाख रुपयांचे बनावट दागिने सोन्याचे असल्याचे सांगून सिध्देश्वर पेठ येथील मुत्थूट फायनान्स त्यांच्या मॅनेजरची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फायनान्सचे मॅनेजर अशोक भंडारी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी हिना कौसर जरार अहमद (रा. महात्मा फुले नगर, मजरेवाडी) आणि रेश्मा ईरफान शिलेदार (फकीर गल्ली शास्त्री नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघा महिलांनी मिळून ११ सप्टेंबर २०१४ रोजी ५६ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, ऑक्टोबर २०१४ रोजी २८.०५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, डिसेंबर २०१४ रोजी २७.०५ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, १४ फेब्रुवारी २०१५ रोजी ५५.५ ग्रॅम सोन्याचे बांगड्या फायनान्सकडे ठेवून कर्ज घेतले होते. वास्ताविक पाहता हे सोन्याचे दागिने बनावट होते. या प्रकरणात फायनान्सची लाख ११ हजार २८३ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुकान फोडले
सम्राट चौक येथील पंचरत्न बिल्डिंग येथील बंद दुकान फोडून आतील रोख आठ हजार रुपये आणि एसबीआय अॅक्सिस बॅँकेचे एटीएम कार्ड अज्ञात चोराने चोरले. याबाबत मिथून जयंतीलाल दोशी (वय ३३) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
३४ हजारांचा एेवज लंपास
शनिवार पेठ येथील जिजामाता हॉस्पिटलजवळ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चाेराने मागील भिंतीवर चढून घरात प्रवेश केला आणि सुमारे ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत महमद मोहसीन महमद रफिक जेलर यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
रेणुका नगरात चोरी
जुळे सोलापूर, रेणुका नगर येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे २२ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोराने लंपास केला. ही घटना ते ऑगस्ट दरम्यान घडली. शिवाजी मच्छिंद्र जाधव यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.