आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू व्हेल गेममधून कधीही बाहेर पडणे शक्य; नंतर धाेका नाहीच, तज्ज्ञांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या मुलाला त्यातून बाहेर काढायचे असल्यास सेटिंगमध्ये जाऊन त्यातून बाहेर पडता येते. या खेळापेक्षा आपला जीव लाखमोलाचा आहे, याचे भान ठेवावे, असा सल्ला सोलापूर, मुंबई येथील सायबर क्राइमतज्ज्ञ आणि संगणकतज्ज्ञांनी दिला अाहे. मोबाइल वापरणाऱ्या मुलांवर पालकांचे लक्ष असावे  हेही महत्त्वाचे अाहे, असेही त्यांनी सांगितले.

हा गेेम खेळताना ५० टास्क असतात. मुले त्यात अडकतात. तो जे टास्क देतो, त्यानुसार कृती करतात. या माध्यमातून गेम खेळणारा आयुष्याचे बरेवाईट करून घेतो. ५०  टास्क पूर्ण झाल्याशिवाय हा गेम बंदच होत नाही, अाणि केल्यास धोका होतो, असा गैरसमज पसरवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात असेच काहीच नसते, असे तज्ज्ञ सांगतात.

सोलापूर, मुंबईच्या सायबर क्राइम तज्ज्ञांचा सल्ला
ब्ल्यू व्हेल गेममध्ये मुलाच्या मेंदूवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे गेममधून मिळणाऱ्या सूचनांचे तो पालन करत जातो. हा गेम  अाता डाऊनलोड करता येत नाही. मात्र ताे दुसऱ्या नावाने अाता सुुरू आहे. त्यासाठी कोणीही हा गेम खेळू नये. पालकांनी  मुलांवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
- रवींद्र गायकवाड, सोलापूर सायबर सेल प्रमुख.

ब्ल्यू व्हेल गेम पूर्वी गुगल वरून डाऊनलोड करता येत होता. मात्र आता तो होत नाही. कोणाकडे तो गेम असेल त्यांच्याकडून लिंक मिळते आणि या गेममध्ये अनेकजण सहभागी होतात. जी मुले मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. अशीच मुले या गेमच्या जाळ्यात अडकतात आणि काल्पनिक विश्वाच्या अधीन होऊन जातात. या गेममध्ये पन्नास टास्क असतात. पन्नास टास्क पूर्ण होईपर्यंत गेम बंद होत नाही, असा गैरसमज आहे. हा गेम कुठल्याही टास्कवेळी बंद होऊ शकतो. पालकांनी जागरूक राहून मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- अॅड. प्रशांत माळी, सायबर क्राइमतज्ज्ञ, तथा अॅड. मुंबई उच्च न्यायालय

ब्ल्यू व्हेल गेम खेळण्यासाठी वयोगटाचे बंधन नाही.  मध्यरात्री ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा गेम खेळला जातो. अकाउंट रजिस्टर केल्यानंतर हा गेम खेळता येतो. मात्र घाबरण्याचे कारण नाही. गेम सुरू केल्यानंतर त्याचे ५० टास्क पूर्ण करावे, अन्यथा धोका होतो, असा गैरसमज आहे. एकतर अशा गेममध्ये प्रवेश करूच नये. जर अनवधाने गेममध्ये प्रवेश केल्यास त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन अापण हा गेम कुठल्याही टास्कवेळी बंद करू शकता.
सौरभ बडवे, संगणकतज्ज्ञ, पुणे
 
बातम्या आणखी आहेत...