आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमच्या रांगेत घुसली कार, 16 जणांना उडवले, दोघांंची प्रकृती चिंंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- एका बॅंकेच्या एटीएमबाहेरील रांगेत एकाने कार घुसवल्याने 16 जण जखमी झाले आहेत. त्यात दोघांंची प्रकृती चिंताजनक आहे. विजापूर रोडवर आतारनगरमध्ये इंडियन बँकेच्या एटीएमसमोर आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला.

संतप्त जमावाने मद्यपी कार चालक संंतोष माडगे याला पकडून त्याला बेदम चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे.
दोघांची प्रकृती चिंताजनक...
आतार नगरात इंडियन बँकेच्या एटीएमबाहेर काही नागरिक पैसेे काढण्यासाठी उभे होते. त्याचवेळी एक कार भरधाव वेगात रांंगेत घुसली. कार चालक दारुच्या नशेत तर्रर्र होता. त्याला संतप्त नागरिकांंना पकडून त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी माजी सभापती सुभाष चव्हाण यांचा कामगार...
आरोपी महापालिकेचे परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांचा कार चालक आहे.
बँक व्यवस्थापनच जबाबदार
^बँकअाॅफ इंडियाने अपघाती ग्राहकांच्या वैद्यकीय इलाजासाठी अार्थिक मदत करणे क्रमप्राप्त अाहे. बँक इमारत अावारात सुविधा नसेल तर ग्राहकांना टोकन क्रमांक देऊन रांग टाळता येते. रस्त्यावर रांग लावण्यास बँक व्यवस्थापनच जबाबदार अाहे. अपघात क्लेमपूर्वी तातडीची मदत करावी. ’’ अॅड.रा. गो. म्हेत्रस, ज्येष्ठ िवधिज्ञ

सुरक्षिततेची काळजी घेऊ
^बँकेत सुरक्षा रक्षक अाहे. रांगेत नागरिक थांबल्यानंतर कार घुसली. नागरिकांची गर्दी रस्त्यावर होऊ नये म्हणून अाम्ही अात घेतोच. अाज नेमके बँक उघडायला हा प्रकार घडला. अाणखी काळजी घेऊ. सुरक्षा रक्षक वाढवू.'' अोमप्रकाश, बँक मॅनेजर, बँक अाॅफ इंडिया

काहीच कळले नाही
^सकाळपासूनच गर्दीहोती. पाठीमागून कार अाल्यामुळे घटनेची गांभीर्य कळले नाही. अपघातानंतर गोंधळ उडाला. चौदा लोकांना तो ठोकरला. बँकेत नेहमीच गर्दी असते. काहीतरी उपाय करणे गरजेचे अाहे.'' राज अहमद मुल्ला, प्रत्यक्षदर्शी

अारोपी अटकेत
^संशयित अारोपी माळगेला अटक झाली आहे. गाडीचे मालक सुभाष चव्हाण यांच्यावरही सहअारोपी म्हणून कारवाई करणार अाहे. चालक मद्य पिला होता की नाही हे वैद्यकीय अहवाल अाल्यानंतर कळेल. आवश्यक ते सर्व कलम लावू. सीसीटीव्ही फुटेज पाहणार अाहोत.'' नरसिंग अंकुशकर, पोलिस निरीक्षक, विजापूर नाका

गोंधळ, गलका; काही वेळ घटनाच कळली नाही
बँक अाॅफ इंडिया इंडियन बँक शेजारी अाहेत. बँक सकाळी साडेदहाला उघडते. दीडशे-दोनशे नागरिक रांगेत होते. मनपा परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांच्या घरातून माळगे हा कार (एमएच १३ एसी ४३६३) घेऊन बाहेर अाला. त्याचा ताबा सुटल्यामुळे रांगेतील नागरिकांना ठोकरला. तिघेजण उडून पडले. समोर थांबलेल्या कारला (एमएच १३ एझेड ००२५) ठोकरून घराच्या गेटला जाऊन धडकला. जमावाने चालकाला चोप दिला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. पोलिस बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासत अाहेत. त्याचा अाधार तपासासाठी हाेईल. बँकेसमोर प्रचंड गर्दी झाली होती. नातेवाईकांचा अाक्राेश, रडणे सुरूच होते. िवजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधीत घटनेेचे फोटोज्
बातम्या आणखी आहेत...