आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोरील वाहनाच्या प्रकाशामुळे ताबा सुटला, कार तीनदा उलटून झाडावर आदळली; तीन मित्रांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाच मित्र हाॅटेलात जेवायला जात होते. त्यानंतर धुळखेड येथील एका मित्राच्या घरी जाणार होते. त्याअगोदरच वडकबाळ पुलाच्या अलीकडील वळणावर कार खड्ड्यात उलटून झाडावर अादळल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी पहाटे दोनच्या सुमाराला घडला. हा अपघात इतका भयानक होता की झाड कारच्यामध्ये एक तरुण अडकला होता. पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेतानाचे मित्र अाहेत.
 
त्यापैकी तिघेजण मुंबईत खासगी कंपनीत काम करतात. दोघेजण सोलापुरात. वीरेंद्र लक्ष्मण तलवार (वय २५, रा. श्रीपाद अपार्टमेंट, उरण, नवी मुंबई, मूळगाव- सलगर, ता. अक्कलकोट), नितीन शंकर बिराजदार (वय २७, रा. धुळखेड, इंडी, हल्ली- उरण, नवीमुंबई), तेजस अशोक वाडदेकर (वय २५, रा. सिंधू विहार, जुळे सोलापूर) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. मिलिंद दत्तात्रय वाघमारे (वय २५, रा. सैफुल, सोलापूर), अाकाश सूर्यकांत गायकवाड (रा. २६, रा. सोलापूर, हल्ली उरण, नवी मुंबई) हे जखमी झालेत. 
 
अाकाशने विजापूर नाका पोलिसात तक्रार दिली अाहे. तेजस हा सोलापुरातील सिंहगड काॅलेजात सेवक म्हणून कामाला होता. वीरेंद्र, नितीन अाकाश तिघे मुंबईत कामाला अाहेत. वीरेंद्रच्या नातेवाईकाचा अाज सकाळी शहरात कार्यक्रम होता. यासाठी तिघेजण मुंबईहून काल रात्री सोलापुरात अाले. अपघातप्रसंगी कार थेट खड्ड्यात जाऊन उलटली. तीन पलटी खाऊन झाडावर अादळली. नितीन तेजस दोघेजण उडून खाली पडले. वीरेंद्र हा कार झाडामध्ये अडकला होता. 

कारचापत्रा कापून बाहेर काढले : पहाटेअपघाताचे वृत्त समजाताच पोलिस घटनास्थळी गेले. सर्वांना शासकीय रुग्णालयात अाणल्यानंतर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले. मिलिंदवर उपचार सुरू अाहेत. अाकाशला किरकोळ दुखापत झाली अाहे. पाचही जण जेवायला जाताना अपघात झाला. कारचा चक्काकूर झाला अाहे. तलवारला कारचा पत्रा कापून बाहेर काढल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. घटनास्थळी पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते यांनी पाहणी केली. 

वीरेंद्र,नितीन अाकाश तिघे मुंबईत कामाला अाहेत
वीरेंद्रच्या नातेवाईकाचा अाज सकाळी शहरात कार्यक्रम होता. यासाठी तिघेजण मुंबईहून काल रात्री सोलापुरात अाले. नितीनची अाई धुळखेड येथे राहण्यास अाहे. त्यांना भेटण्यासाठीही जाणार होते. अपघातप्रसंगी कार थेट खड्डयात जाऊन उलटली. तीन पलटी खाऊन झाडावर अादळली. नितीन तेजस दोघेजण उडून खाली पडले. वीरेंद्र हा कार झाडामध्ये अडकला होता. 

वीरेंद्रचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला होता. त्याला तीन महिन्याची मुलगी, पत्नी अाई असा परिवार अाहे. नितीन तेजस अविवाहित होते. तेजस हा सिंहगड काॅलेजमध्ये कामाला होता. दोन बहिणी अाई असा परिवार अाहे. घरात कर्ता पुरुष तोच होता. अाकाश याने नातेवाईकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 
 
कारचा पत्रा कापून बाहेर काढले 
पहाटे अपघाताचे वृत्त समजाताच पोलिस घटनास्थळी गेले. सर्वांना शासकीय रूग्णालयात अाणल्यानंतर तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात अाले. मिलींदवर उपचार सुरू अाहेत. अाकाशला किरकोळ दुखापत झाली अाहे. पाचहीजण जेवायला जाताना अपघात झाला. कारचा चककाकूर झाला अाहे. तलवारला कारचा पत्रा कापून बाहेर काढल्याची माहिती पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल कोळी तपास करीत अाहेत. घटनास्थळी पोलिस अायुक्त रवींद्र सेगनावकर, उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते यांनी पाहणी केली.