आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-मोटारसायकल अपघातात सोलापुरातील युवकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अक्कलकोट तालुक्यातील ब्यागेहळ्ळी येथे रिलायन्स पेट्रोल पंपजवळ कार - मोटारसायकल अपघातात सोलापुरातील वृत्तपत्र विक्रेत्या युवकाचा मृत्यू झाला. बसवराज सुरेश माशाळकर (वय ३३, रा. सुशील नगर, विजापूर रस्ता) असे या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर कार झाडाला धडकल्याने त्यातील चौघे जखमी झाले. त्यांना सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता झाला.

माशाळकर हा अक्कलकोटला लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्यास चालला होता. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मेव्हण्याचा शुक्रवारी लग्न सोहळा होता. पत्नी मुले आधीच या लग्नाला अक्कलकोट येथे गेले होते. अपघाताची घटना कळताच माशाळकर परिवारवर दु:खाचा डोंगर कोसळला.