आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक; महिलेचा मृत्यू, 9 जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त कार. - Divya Marathi
अपघातग्रस्त कार.
सोलापूर/मोहोळ- पुण्याहून सोलापूरकडे जाणारी इनोव्हा कार व सोलापूरहुन मुंबईकडे जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर 9 जण जखमी झाल्याची घटना मोहोळपासून दोन किलोमोटर अंतरावर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडली. जखमींपैकी अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अफसनाबानू महंमद जावीद असे मृत महिलेचे नाव आहे.
 
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंध्रप्रदेश येथून नाशिक कडे निघालेला ट्रक ( टी . एन . 46 एस . 7941)  हा जात असता पुण्याहून सोलापूरकडे निघालेली इनोव्हा कार यांची चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर समोरासमोर धडक झाली. अपघातात अफसनाबानू महंमद जावीद (वय 18, रा. मोघलपूरा, चारमिनार, हैद्रराबाद) ही महिला जागीच ठार झाली. तर महंमद जाविद महंमद हुसेन (वय 45) , अमीनाबानू महंमद इब्राहीम (वय 17), मुबिनाबानू महंमद इब्राहिम (वय 35) , महंमद बिलाला महंमद जाविद (वय 20), महंमद उसामा महंमद इब्राहिम (वय 14), अमीनाबानू महंमद इब्राहिम (वय 13), समाधरबानू महंमद जाविद (वय 12) , सबीकाबानू महंमद जाविद (वय 40), सुहाबानू महंमद जाविद (वय 8 सर्व रा. मोघलपुराजवळ चारमिनार, हैदराबाद) हे जखमी झाले. यामध्ये अमिनाबानू महंमद इब्राहिम यांच्यासह अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
 
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनी नागराज निंबाळे, पोलिस नाईक सुभाष गोरे, हरिदास आदलिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून दिले. याबाबत ट्रकचालक मन्नीवन रामन्ना (रा. तुरईकुडी, उमामहेश्वरपुरम, तामिळनाडू) यांच्यावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनी नागराज निंबाळे करीत आहेत. 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...