आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षणासाठी साेलापुरात दाखवले मुख्यमंत्र्यांना गाजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - मराठा अारक्षणाची मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी साेलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाजर दाखवून अनाेखे अांदाेलन केले. मुख्यमंत्री अाजवर अाम्हाला अाश्वासनांचे गाजर दाखवत अाले अाहेत, त्याच्या निषेधार्थ हे अांदाेलन करण्यात अाल्याचे अायाेजकांचे म्हणणे अाहे.  साेलापूर महापालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची मंगळवारी शहरात सभा झाली. तत्पूर्वी चार हुतात्मा चाैकात हे अांदाेलन करण्यात अाले. नांदेड येथील सभेत मराठा अारक्षणासाठी घाेषणाबाजी झाली तेव्हा ‘फोटो काढा आणि बाजूला बसा’ असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याचाही अांदाेलकांच्या वतीने निषेध करण्यात अाला.

लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येऊनही कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही. जगभरात त्याची दखल घेण्यात आली. अशी आंदोलने केवळ फोटोसेशनसाठी झाल्याचे मुख्यमंत्री बोलले. हा समाजाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया  अांदाेलक माऊली पवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...