आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिवळा रंग विक्री, कारवाई कोणी करायची? कामगार आत्महत्या प्रकरण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरामध्ये मागील दोन-तीन महिन्यांपासून पिवळा रंग पिऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये शहरातील कामगार वसाहतीमधील महिला कामगारांचे प्रमाण अधिक आहे. मात्र हा रंग विक्री होऊ नये ? यासंबंधी कारवाई करायची कोणावर ? यासंबंधी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत पेच निर्माण झाला. यावर जिल्हाधिकारी यांनीच पिवळा रंग निर्मितीपासून ते विक्री होण्यापर्यंत संबंधित असलेल्या विभागांची बैठक बोलाविण्याचा निर्णय झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अन्न सुरक्षा कायदा जिल्हास्तरीय समितीची बैठकी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अन्न प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे, पोलीस उपायुक्त पौर्णिकबैठकीत जिल्ह्यातील दूध भेसळ, गुटखा कारवाई, आषाढी वारी यात्रेतील तपासणी आदीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गुटखा प्रकरणी कारवाई तीव्र करण्याबरोबरच दूधातील भेसळ राेखण्यासाठी तालुकानिहाय पथकांची नियुक्ती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.

२०अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची करण्यात आली नियुक्ती...
आषाढीएकादशीसाठी खाद्यपदार्थाची तपासणी करण्यासाठी पुणे, सांगली, सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातून अन्न सुरक्षा अधिकारी मागविण्यात येणार आहेत. ते १० जुलै कालावधीत पालखी मार्गावरील हॉटेल हातागाड्यांवरील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. ११ ते १५ जुलै या कालवधीत पंढरपूर शहरातील हॉटेलची तपासणी करण्यात येईल. यासंबंधीची मागणी संबंधित कार्यालयास करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.
खाद्यपदार्थ नसल्याने अडचण...
शहराच्या कामगार वसाहतीमध्ये विशेषत: विडी कामगारांकडून पिवळा रंग पिऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र पिवळा रंग हा खाद्यपदार्थामध्ये येत नसल्याने यावर कारवाई कोण करायची ? असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला. यापूर्वीचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पिवळा रंगाबाबत आवाहन केेले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पोलीस, जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक सुरक्षा केंद्र या विभागाची लवकरच स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...