आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढतोय कॅशलेस व्यवहार, गुन्ह्यांवर अंकुशाची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. बंॅकांचा त्यासाठी आग्रही वाढत आहे. आता हळूहळू कॅशलेस व्यवहारात वाढ होणार आहे. परिणामी, इंटरनेट आणि ई- काॅमर्स गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून सायबर लॅब कक्षाचे रूपांतर पोलिस ठाण्यात करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली अाहे. त्यामुळे राज्यात आता ४३ सायबर पोलिस ठाणे होतील. गुन्ह्यांचा उकल जलदगतीने व्हावा हा उद्देश यामागे आहे.
१५ अाॅगस्ट २०१६ रोजी एकाच दिवशी राज्यभरात ४३ सायबर लॅब कक्षाचे उद््घाटन झाले. त्यासाठी स्वतंत्र संगणक रूम, प्रशिक्षित मनुष्यबळ देण्यात अाला आहे. मागील पंधरवड्यात शासनाने गॅझेट नोंद करून जीअार प्रसिद्ध केला अाहे. राज्यातील पोलिस अधीक्षक पोलिस अायुक्तालयात ही सोय राहील. पोलिस अधिकाऱ्यांना तसे अाादेश देण्यात अाले आहेत.

थेट तक्रार देऊ शकता
जिल्ह्यात कुठल्याही ठाण्यात सायबर अॅक्टचा गुन्हा घडल्यास सायबर ठाण्यात तक्रार देऊ शकता. अथवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा सायबर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येईल. संपूर्ण जिल्ह्यासाठी गुरूनानक चौकात सायबर लॅब अाहे. सोलापूर शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत असा प्रकार घडल्यास शहर अायुक्तालयातील सायबर कक्षात तक्रार देऊ शकता.

का भासली निकड
देशात सध्या १० टक्के व्यवहार कॅशलेस पद्धतीने चालतात. अायटी अॅक्टखाली गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण भविष्यात वाढतील. ही गरज अोळखून स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या लॅब कक्षात १० ते १५ पोलिस अधिकारी, कर्मचारी काम करतात. पोलिस ठाण्यात वाढीव तीस - चाळीस जणांची टीम राहील. त्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याचा मानस गृहविभागाचा अाहे.

अधिकारी म्हणतात...
बालसिंग रजपूत, राज्य पोलिस अधीक्षक, सायबर सेल कक्ष, मुंबई
^सायबरक्राईमचेगुन्हे वाढण्याची शक्यता गृहीत धरून अाम्ही ही पावले उचलत अाहोत. तज्ञांची चमूही तयार करण्यात येत आहे. अागामी पाच वर्षात राज्यभरात प्रशिक्षित पोलिस राहतील, असा अामचा मानस अाहे. सायबर लॅबचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी जीअार निघाला अाहे. पोलिस अधीक्षक पोलिस अायुक्त अापल्याकडील मुनष्यबळ वापरून काम सुरू करू शकतात. नागरिक थेट या ठाण्यात तक्रार नोंदवू शकतात. या ठाण्याकडून स्वतंत्रपणे तपास होऊ शकतो. गुन्हा घडल्यापासून अारोपपत्र दाखल करण्यापर्यंतचे काम राहील.
बातम्या आणखी आहेत...