आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे स्थानकानजीकच्या ट्रॅकवरही सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट दिवे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावरील वाडीच्या दिशेने असलेल्या ट्रॅकवरील टर्नआऊटवर(प्रवेश वळण) लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. तसेच या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आरपीएफ विभागाने हा प्रस्ताव दिला असून डीआरएम यांनीदेखील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी याला होकार दिला आहे. लवकरच याच्या कामास सुरुवात होणार आहे. 


सोलापूर रेल्वे स्थानकाच्या वाडीच्या दिशेने असलेल्या टर्नआऊटजवळ अनेकदा चोरीच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी प्रकाशाची कोणतीच व्यवस्था नाही. अंधाराचा फायदा चोरटे घेतात. रात्री स्थानकावर चोरी करून अंधारात ते पळून जातात. याचा विचार करून आरपीएफ विभागाने नाईट व्हीजनचे सीसीटीव्ही कॅमेरे मोठे हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी केली. त्यास मान्यता मिळाली असूून प्रथम टर्नआऊटवर कॅमेरे बसविले जाणार आहे. किती कॅमेरे बसवायचे याचा अभ्यास इलेक्ट्रिकल विभागाकडून सुरू आहे. सध्या केवळ पुणेच्या दिशेने असलेल्या टर्नआऊटवरच प्रकाशाची व्यवस्था केली आहे. 


लवकरच कामास सुरुवात 
सीसीटीव्ही कॅमेरे हायमास्ट दिवे बसविल्याने स्थानकावरील गुन्ह्यांच्या संख्येत घट होण्यास मदत होईल. प्रवासी सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली होती. डीआरएमनी याला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच कामास सुरुवात होईल. 
- जयण्णा कृपाकर, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ 

बातम्या आणखी आहेत...