आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे अपघात टाळण्याकरिता आता रुळावर येणार कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वे अपघात टाळण्यासाठी रुळावर आणि रुळाच्या दुतर्फा कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यातून डब्याखाली लोंबकळणाऱ्या भागाचा शोध येऊन संभाव्य अपघात रोखणे शक्य होणार आहे.
हे कॅमेरे एका सेकंदात ६० फोटो काढू शकतील आणि हे फोटो गाडी स्थानकात येण्यापूर्वी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या स्क्रीनवर दिसतील. काही भाग लोंबकळत असल्यास ते वेळेत दिसून येईल आणि त्याची दुरुस्ती करण्यात येईल. येत्या एक ते दोन महिन्यात या प्रकारची सुविधा सोलापूर स्थानकावर सुरू होईल. यामुळे सुरक्षित प्रवास होण्यास मदत मिळणार आहे.
गाड्या स्थानकावर येताना मेकॅनिकी विभागाचे कर्मचारी डब्याखाली पाहणी करतात. काही आढळले तर त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना देतात. गाडी स्थानकावर आल्यानंतर तो दोष दूर केला जातो. यात सुमारे २५ मिनिटांचा अवधी लागतो. यासाठी कर्मचारी दिवस-रात्र बसून असतात.

नव्या यंत्रणेत कर्मचाऱ्यांना बसण्याची गरज नाही. तसेच हे सर्व कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होत असल्याने यात मानवी चुकांचे प्रमाण अत्यंत कमी असणार आहे. सोलापूर रेल्वे प्रशासनाकडून दमाणी नगरच्या पुलाखाली ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच येथे डब्यांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारणार आहे. या कक्षात बसून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यासाठी चार ते पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा असतो धोका
गाडी थांबवण्यासाठी ब्रेक बीमचा वापर होतो. हे बीम कधी कधी लटकू शकतात. तसेच रेल्वे थांबवण्यासाठी एअर प्रेशरचा वापर होतो. याचे पाइप तुटून लटकू शकतात. डब्यांचे स्प्रिंग तुटल्यानंतर ते चाकात येऊन अपघात घडू शकतो. त्यामुळे कर्मचारी प्रत्येक डब्यांखालची स्थिती पाहत असतात.

सुखद सोमवार
^अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक अशा कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. यासाठी किमान एक ते दोन महिन्यांचा अवधी लागू शकतो.” शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...