आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल काॅलेजसह सिव्हिलमध्ये सीसीटीव्ही बसणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय डॉ. व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालयात येत्या आठवडाभरात सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक यांना बसल्या ठिकाणी कोठे काय सुरू आहे हे पाहता येणार आहे. सीसीटीव्हीची नजर असल्याने काम गतिमान पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
डॉक्टरांवर वारंवार हल्ले होत असल्याने मार्ड संघटनेने सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी अधिष्ठाता यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत. सीसीटीव्हीचा विषय प्रलंबित होता. शासनाकडून सीसीटीव्ही बसवण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे मार्ड संघटनेने केलेली मागणी मार्गी लागली आहे.

दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटल दक्षता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सीसीटीव्ही बसवण्याबाबत चर्चा झाली. वैद्यकीय महाविद्यालय आणि सिव्हिल हाॅस्पिटल मिळून एकूण ६५ सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून ६१ सीसीटीव्ही कॅमेर मंजूर आहेत. आणखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

या ठिकाणी बसवणार कॅमेरे
बीब्लाॅकमधील तळमजला-९, पहिला मजला-४, दुसरा मजला-४ तिसरा- ४, ब्लॉकमध्ये -७, सी ब्लॉक -२, पोस्टमार्टेम विभाग-१, टीबी वार्ड- १, सिव्हिल कॅन्टीन - १, नर्सिंग होस्टेल-१, ओपीडी- ६, नर्सिंग महाविद्यालय-३, पीजी विभाग- ८, वैद्यकीय महाविद्यालय इमारत-१२, यूजी विभाग- असे ६५ सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यात येणार आहेत.
सीसीटीव्ही खरेदी करण्यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या आहेत. आठवडाभरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम करण्यात येईल. डॉ. डी. डी. गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक
बातम्या आणखी आहेत...