आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिरामध्ये आनंदोत्सव, यात्रेतील मानाच्या खांबाचे पूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: होम मैदानावरील पारंपरिक रस्ता यात्रा काळात मंदिर समितीला देण्याचा निर्णय झाल्याने सिद्धेश्वर मंदिरात असा जल्लोष झाला.
सोलापूर - श्रीसिद्धेश्वर मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात आपत्कालीन रस्ता कोणत्या ठिकाणी असावा या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा निघाल्याने मंदिर समिती पदाधिकारी सिद्धेश्वर भक्तांनी गुरुवारी मंदिरात एकच जल्लोष केला. गेल्या दीड महिन्यापासून वाद सुरू होता. मात्र यावर कोणतेही एकमत झाल्याने मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्यात आला. दरम्यान, मंदिर समितीने डाॅ. आंबेडकर (पार्क) चौक ते सिद्धेश्वर कन्या प्रशाला या मार्गाची एक बाजू आपत्कालीन रस्ता म्हणून वापरावी, असा पर्याय दिल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी स्पष्ट केले आहे.

होम मैदानावरील जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा रस्ता मंदिर समितीला मिळावा, या मागणीसाठी रास्ता रोको, चक्री उपोषण करण्यात आले. यानंतर याते सहभागी सर्व मान्यवरांचा गौरव मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला. यानंतर गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. सिद्धेश्वर महाराजांनीच अन्याय दूर केल्याची भावना श्री. काडादी यांनी मनोगतामध्ये बोलून दाखवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंदिर समिती जिल्हा प्रशासन यांच्यातील वादावर तोडगा काढत तो वादग्रस्त रस्ता यात्रा भरवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून मंदिर समिती सिद्धेश्वर भक्तांनी लढा सुरू ठेवला होता. त्याला यश मिळाल्याने मंदिर समितीने मंदिरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महापौर सुशीला आबुटे, माजी आमदार नरसय्या आडम, शिवशरण पाटील, राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, अशोक निंबर्गी, मनोहर सपाटे, जगदीश पाटील, आनंद मुस्तारे, माजी कुलगुरू डाॅ. इरेश स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांच्यामुळे आंदोलन झाले यशस्वी : या आंदोलनात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, नरसय्या आडम यांच्यासह आमचे सर्व पदाधिकारी सिद्धेश्वर भक्तांनी आंदोलन यशस्वी करून हा विषय शासनापर्यंत पोहचवला. मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेऊन मंदिर समितीच्या बाजूने निर्णय देत होम मैदानावरील रस्ता मंदिर समितीला वापरण्यास दिला.

देवस्थानच्या हक्कासाठीच उठवला आवाज : हा विजय एकट्या काडादी यांचा नाही, मी निमित्तमात्र आहे. मी एक सेवक आहे. गेला महिनाभर जिल्हाधिकाऱ्यांच्या अन्यायी निर्णयाविरोधात सर्व सिद्धेश्वरभक्तांनी लढा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समितीला विश्वासात घेता सर्व निर्णय घेतले. आम्ही फक्त देवस्थानचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आवाज उठविला, त्याला सर्व जणांनी साथ देत हा लढा यशस्वी केला.

खड्डे बुजवणे जिल्हाधिकाऱ्यांचीच जबाबदारी : यात्रेनंतर हा रस्ता दुरुस्त करणार का, या प्रश्नावर श्री. काडादी म्हणाले, मुळात त्याठिकाणी रस्ताच नाही. न्यायालयीन निर्णय आमच्या बाजूने आहेत. यात्रेनंतर रस्ता करा, अशी विनंती आम्ही मनपा आयुक्तांना केली होती. परंतु, जिल्हाधिकारी यांनी यात्रेपूर्वी मुद्दाम रस्ता केला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी ज्यांनी रस्ता केला त्यांचीच आहे. त्यांनीच तो बुजवावा.