आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पीएफ’पोटी मालकाच्या हिश्श्यातील 8.33% पैसे केंद्र सरकार भरणार; नवीनकामगारांना लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कामगारां च्याभविष्य निर्वाह निधीतील मालकाचा हिस्सा केंद्राने भरण्याची योजना आली. ज्याला ‘प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना’ म्हटले, त्यालाही यंत्रमागधारक नाहीच म्हणाले. निधीच्या अंशदानात १२ टक्क्यांपैकी ८.३३ टक्के रक्कम केंद्र भरेल. मालकांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम केवळ ३.६७ टक्के भरावयाची आहे. त्यालाही प्रतिसाद नसल्याची हताश भावना विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी व्यक्त केली. 


एप्रिल २०१६ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. यंत्रमागधारकांना २००२ पासून पूर्वलक्षीप्रभावाने निधी भरण्याच्या नोटिसा दिल्या. परंतु ही मंडळी या योजनेत आली तरी त्यांचे स्वागत आहे. योजनेची सर्व माहिती त्यांना दिली. नवीन कामगारांसाठीच ही योजना देता येते. एप्रिल २०१६ पासूनच नवीन कामगार दाखवून कामगारांना केंद्राचा हिस्सा घेऊन त्याचा लाभ मिळवून द्या, असे सांगितले. परंतु त्यांना कायदाच नको. म्हणून तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली, असेही ते म्हणाले. 


कंपन्यांकडूनही प्रतिसाद मिळत नाही 
‘प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना’ची माहिती देण्यासाठी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. नवीन कामगारांसाठी ही योजना आहे. एप्रिल २०१६ पासून लागलेल्या सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळेल. ज्या कंपन्यांनी याेजनेपूर्वी स्वत:चा हिस्सा (१२ टक्के) हिस्सा भरलेला असेल, त्यांना केंद्राच्या रकमेची वजावट मिळेल. त्यासाठी ऑनलाइन नोंदणीची सोपी पद्धत आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर चलन तयार झाले की, केंद्राचा हिस्सा जमा होऊन देय रक्कम दाखवेल. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. तिरपुडे यांनी केले आहे. 


किर्लोस्कर फेरससह ३४ कंपन्यांची नोंदणी 
सोलापुरातून किर्लाेस्कर फेरस इंडस्ट्रीजसह अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. ब्रह्मसागर डिस्टिलरीज (श्रीपूर), धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट, देसाई ब्रदर्स लिमिटेड, जगदाळे मामा हॉस्पिटल (बार्शी), सिद्धेश्वर साखर कारखाना, लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट हायस्कूल, शर्मा अँड सन्स, बालाजी अमाइन्स, बालाजी सरोवर प्रीमियर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना, प्रिसिजन कॅमशाफ्टस् लिमिटेड, सृजन फूडस्, शिंगवी ज्वेलर्स, बाकळे कलेक्शन, राऊत हॉस्पिटल, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आदी. 


संग्धितेमुळे प्रतिसाद नाही 
पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेची माहिती तिरपुडे यांनी आम्हाला दिली. परंतु ती नवीन उद्योग आणि नव्या रोजगारासाठी असल्याचे दिसून आले. शिवाय २०१६ पासून तो लागू झाला आहे. उर्वरित दीड वर्षासाठीच ही योजना मिळणार आहे. आणि काही बाबी स्पष्टच होत नाहीत. या संग्धितेमुळे आम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही. 
- पेंटप्पागड्म, अध्यक्ष, जिल्हा यंत्रमागधारक संघ 


तिरपुडेंवर दबाव 
तिरपुडेयांच्यावर वरूनही दबाव येत असल्याचे एकूण स्थितीवरून जाणवते. ते दिल्लीहून परतले, त्यानंतर यंत्रमागधारकांवरील कारवाई थोडीशी शिथिल झाली. त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार, मंत्र्यांनीही वरपर्यंत तक्रारी केल्या. त्यामुळे केंद्रीय श्रममंत्रालयाच्या सहसचिवांनीच त्यांना थोडेसे नमते घेण्यास सांगितले. 


न्यायालयाचे असेही 
हिमालया टेक्स्टाइलने कारवाईला मुंबईच्या आैद्योगिक लवादाकडून स्थगिती मिळवली. त्यासंदर्भात समोरील पक्षाला कुठल्याही नोटिसा नाहीत. दुपारी चार वाजता स्थगितीचा अर्ज आणि त्यानंतर सायंकाळी सहाला त्यावर आदेश झाला. त्याच्या विरोधात अर्ज देण्यासाठी २१ नोव्हेंबरला वकिलासोबत डॉ. तिरपुडे गेले. त्या दिवशी सुनावणी असतानाही न्यायमूर्ती रजेवर गेल्याचे कळले. 

बातम्या आणखी आहेत...