आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र हिसकावणे, चोरी रोखण्यासाठी जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशेहून अधिक मंडळांच्या बप्पांना आज भावपूर्ण निरोप देण्यास भाविकांची गर्दी होणार आहे. यावेळी कायदा सुव्यस्था अबाधित असण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. चौकात स्वागत आणि सूचना कक्ष उभारण्यात आलेत. विशेषत: मौलाली चौक, सातस्ता, संभाजी तलाव, आयटीआय पोलिस चौकी, खाटीक मश्जिद, पंजाब तालीम, गणपती घाट, बाळीवेस, नवी वेस चौकी, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती आदी पस्तीस ठिकाणी कॅमेरे असतील. मिरवणूक ठिकाणी वॉच टॉवर, छायाचित्रण पथक आहे.

पीआयचे मिरवणुकीवर लक्ष
सदर बझारचे एस. डी. दसूरकर, एमआयडीसीचे विष्णू पवार, विजापूर नाकाचे एन. बी. अंकुशकर, फौजदार चावडीचे यशवंत शिर्के , जोडभावीचे ईश्वर ओमासे, जेल रोडचे फारुख काझी, सलगर वस्तीचे जयवंत खाडे यांचे मिरवणुकीतील हालचालीवर लक्ष असेल.विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाच्या मिरवणुकीस सायंकाळी पाचला नेहरू नगर येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, असे मध्यवर्तीचे संस्थापक सदस्य विजय शाबादे यांनी सांगितले.

विजापूर रोडवर भक्तांना बसण्याची सोय करण्यात आली आहे.
गणेश विसर्जन स्थळी महापालिकेने संबंधित झोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केलीे आहे. याशिवाय धर्मवीर संभाजी तलाव, सिध्देश्वर तलावसह आदी ठिकाणी जीवरक्षक नेमण्यात आले आहे. गणेश विसर्जन मार्गावर आवश्यक त्या नागरी सोयी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आहे. अापतकालीन यंत्रणा महापालिका नगर अभियंता स्टोअर विभागात राखीव ठेवण्यात आली आहे.
मंगळसूत्र हिसकावणे, पोलिस आहे अथवा दंगा सुरू आहे म्हणून दागिने काढून घेऊन पळून जाणे, पेय अथवा खाद्य पदार्थमध्ये गुंगीचे औषध देऊन लुबाडणे या घटना टाळण्यासाठी महिलांनी कसे सावध राहावे याबाबत वाहतूक पोलिसांनी एक व्हिडीओ आॅडियो क्लिप प्रसारित केली आहे. पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, दोन निरीक्षक दोन क्रेनच्या वाहनांवर स्पीकरवरून सूचना देणार आहेत. तसेच व्हिडीओ क्लीप प्रसारित करणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक रवी घोडके यांनी दिली.
तीन हजारांचा ताफा; प्रभू
सोलापूरतील गणपती मिरवणुकीसाठी जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. सात उपअधीक्षक, तेवीस पीआय, सव्वाशे एपीआय, पीएसआय, अठराशे कर्मचारी, एक शीघ्रकृती दल, एक आयटीबीटी पथक, दोन राज्य राखीव दल पथक, साडेसातशे होमगार्ड असा ताफा तैनात करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले.