आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या प्रेमापोटी चक दे म्हणत २२ युवतींची जमली रागिणी टीम, मल्लिनाथ याळगींचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रागिनी वुमेन्स क्लबचे खेळाडू क्रिकेट सराव करतानाचे छायाचित्र. - Divya Marathi
रागिनी वुमेन्स क्लबचे खेळाडू क्रिकेट सराव करतानाचे छायाचित्र.
सोलापूर - चकदे इंडिया या चित्रपटाप्रमाणे सोलापूरच्या क्रीडाक्षेत्रात हाती जड बॅट आणि चेंडू घेऊन एक नाही, दोन नाही तर चक्क २२ युवती क्रिकेट खेळण्यासाठी पुढे आल्या. येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सकाळ संध्याकाळ चुकता त्या सराव करतात.
या युवतींच्या संघात क्रिकेट खेळण्याचा छंद नाही तर ध्येय आणि वेड लागले आहे. मल्लिनाथ याळगी यांनी जमविलेल्या या संघातून शुभांगी शिवाळ हिची सोलापूर विद्यापीठ संघामध्ये निवडही झाली आहे.

गेले दोन महिने विविध ठिकाणी महिला युवती यापैकी क्रिकेट खेळात रस असलेल्या आणि क्रिकेट खेळत असलेल्या मुलींना घेऊन ही टीम रोजच्या रोज सराव करते आहे. या युवतींचा सहभाग पाहून क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या स्पर्धांत सहभागी होण्याची मदत संघाला करणार आहेत.

असा करतात सराव
रोज सकाळी ते आणि संध्याकाळी ते यावेळेत एस. बी. शिवाळ हे प्रशिक्षक त्यांचा सराव घेतात. रोज व्यायाम घेणे, फिटनेस वाढविणे आदींचा नित्याने ते सराव करून घेतात. या वेळेत महाविद्यालय आणि शाळा शिवाय घरी असणाऱ्या युवती यांच्यासाठी वेळेचे नियोजन करून ते सराव घेतात. या युवती प्रचंड मेहनत घेतात. सरावाची प्रत्यक्ष पद्धत आणि खेळातील बारकावे त्या शिकत आहेत.

-हा सांघिकखेळ असल्यामुळे एकट्याने खेळता येत नाही. तेव्हा या सगळ्यांना एकत्र येऊन खेळता यावे, त्यांना त्यांच्यात असलेल्या क्षमतेचा विकास करता यावा म्हणून मी ही युक्ती लढविली आणि संघाची निर्मिती झाली.''
मल्लिनाथ याळगी, संचालक

खूप आनंद होतो
-मीखूपउत्तम क्रिकेट खेळते. मात्र संघ नसल्यामुळे मी काहीच करू शकत नव्हते. या संघामुळे माझी सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली. याचे श्रेय मी संघाला देईन.''
शुभांगीशिवाळ, विद्यापीठ खेळाडू
असा झाला संघ तयार
मल्लिनाथ याळगी यांनी एक एक युवती जोडून रागिणी क्रिकेट संघाची निमिती केली. हळूहळू २२ युवती जमल्या आणि त्यातून ही रागिणी जन्माला आली.
बातम्या आणखी आहेत...