आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकोते, खेडगी, दुलंगे, बगले यांच्यासह २५ जणांचे अर्ज नामंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ९६ अर्ज आले होते. त्याच्या छाननीत मंगळवारी २५ अर्ज नामंजूर करण्यात आले. ३५ अर्ज वैध ठरले. त्यात सिद्धाराम चाकोते, रमेश दुलंगे, शिवशरण खेडगी, बसवराज बगले, शिवानंद कोनापुरे यांचा समावेश आहे. बँकेच्या पोटनियमातील तरतुदीप्रमाणे १० हजार रुपयांचे शेअर्स आणि ५० हजार रुपयांची ठेव नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे.

बँकेच्या १५ जागांसाठी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. इच्छुकांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारीच छाननी झाली. त्यावर २८ हरकती आल्या. म्हणणे मांडण्यास वेळ मागितल्याने मंगळवारी दुपारपर्यंत त्यावर सुनावण्या झाल्या. त्यानंतर सायंकाळी सात वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात अनेकांना धक्के मिळाले. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश वाले, उपाध्यक्ष नरेंद्र गंभिरे यांच्यासह इतर संचालकांचे अर्ज मंजूर झाले. सर्वसाधारण मतदारसंघातून एकूण १६ अर्ज अवैध ठरले.

पाटील, कुंभार, हिरेमठ यांचे अर्ज झाले मंजूर
सर्वसाधारण मतदारसंघ : मल्लिनाथ पाटील, शांतप्पा कुंभार, इरप्पा सालक्की, सिद्धय्या हिरेमठ, पशुपती माशाळ, चंद्रशेखर बरबडे, मल्लिनाथ विभूते, चंद्रकांत रमणशेट्टी, गुंडप्पा टक्कळकी, शशिकांत तळे, केदारनाथ उंबरजे, श्रीशैल बनशेट्टी, सुरेश चिक्कळ्ळी, मल्लिनाथ रमणशेट्टी, नागनाथ जावळे. महिला प्रतिनिधी : रूपाली बिराजदार, शांता मरगूर, सुचिता थोबडे, शिवलीला वाले. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी : गुंडप्पा टक्कळकी, अशोक लांबतुरे, राजेश म्हेत्रे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी : धानय्या चिवरी, शांतप्पा कुंभार, सिद्धय्या हिरेमठ, पशुपती माशाळ, भीमाशंकर म्हेत्रे, राजशेखर माशाळे. भटक्या जाती जमाती : तुकाराम काळे, प्रकाश वाले, मल्लप्पा निरोळी.

१७ ला होणार चित्र स्पष्ट
१७नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक लागल्यास २८ नोव्हेंबरला मतदान आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...