आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घरातील क्षुल्लक कारणांवरून गोकुळनगर जुळे सोलापूर येथील सविता व्होटकर या विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सासरच्या चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती सचिन व्होटकर हे पोलिस आयुक्तालयात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे फिर्यादीच्या जबाबात म्हटले आहे.

सविता सचिन व्होटकर (वय २७) हिला गेल्या दोन वर्षापासून पती, सासू, दीर, नणंद यांनी घरातील किरकोळ कारणांवरून नेहमी शारीरिक मानसिक छळ केला. याप्रकरणी सचिन, सुनंदा आणि सागर व्होटकर, स्वप्ना कल्याण कोकणे (रा. सर्व बॉम्बे पार्क) यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...